मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा येथील दुकानाच्या काऊंटर वरून चोरीस गेलेले 1लाख किमतीचे मंगळसुत्र चोरल्या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी दोन महिलांना अटक केली असून मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी वैशाली बिरूदेव लवटे वय २८ वर्षे रा. नंदेश्वर ता. मंगळवेढा ह्या दिनांक 25 डिसेंबर रोजी मंगळवेढा येथील रचना मॅचिंग सेंटर किल्ला भाग, मंगळवेढा येथे कपडे खरेदी करणेकरीता गेल्या होत्या.खरेदी करताना तेथे फिर्यादीच्या लहाण मुलाने फिर्यादीच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र तोडले असल्याने फिर्यादी यांनी सदर सोन्याचे मंगळसुत्र घाईमध्ये दुकानातील काउंटरवरती ठेवलेले होते. सदर काउंटरवर फिर्यादीने ठेवलेले सोन्याचे मंगळसुत्र अनोळखी दोन महिलांनी फिर्यादीची नजर चुकवुन घेवुन गेल्याची फिर्याद मंगळवेढा पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.
पोलीस निरीक्षक रणजीत माने, यांच्या मार्गदर्शनाखाली पोना कृष्णा जाधव यांनी सदर प्रकरणात सखोल तपास करून गोपनीय बातमीदार व तांत्रीक पुराव्याचा आधार घेवुन यातील आरोपी उज्वला जयवंत काळे वय ३१ वर्षे , वैशाली जनार्धन काळे वय २५ वर्षे दोघी रा. खडकी, ता. मंगळवेढा यांना खडकी येथून अटक केली. आरोपीस मंगळवेढा येथील न्यायालया समोर हजर केले असता त्यास ३ दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे.आरोपीकडून सुमारे १लाख रूपये किमतीचा सोन्याचे मंगळसुत्र जप्त केले आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी, विकांत गायकवाड,अमोल भारती पोलीस निरीक्षक रणजीत माने, पोसई पुरुषोत्तम धापटे, पोहेकॉ/विठ्ठल विभुते, पोहेकॉ महेश कोळी, पोहेकॉ प्रमोद मोरे, पोहेकों सुनिल गायकवाड, पोहेकॉ सुनिता चवरे, पोहेकॉ वंदना घोडके, पोना कृष्णा जाधव, पोका अमोल राउत, पोकॉ खंडाप्पा हत्ताळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

