सेवानिवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी भिमाशंकर तोडकरी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा येथील सेवानिवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी भिमाशंकर रामचंद्र तोडकरी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ग्रंथतुला व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून भिमाशंकर तोडकरी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.यावेळी व्यासपीठावर ह.भ.प.धोंडोपंत महाराज, जिल्ह्याचे नेते बबनराव अवताडे, धनश्री चे संस्थापक प्रा शिवाजीराव काळुंगे, दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे,यशराजे साळुंखे, डॉ.सुभाष कदम,येताळा भगत,रेवणसिध्द लिगाडे,गोपाळ भगरे, डॉ.विश्वनाथ शिंदे, श्रीधर भोसले,गुलाब पाटील , रामचंद्र दत्तू ,आण्णा वाकडे, प्रशांत यादव, मिलिंद आटकळे,श्रीरंग काटे,अशोक गवळी,प्रदिपकुमार बिराजदार, मनोहर कलूबर्मे, संजय चेळेकर, सुरेश पवार मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आरोही सूर्यकांत तोडकरी हिचा आठवा वाढदिवस व राज्यस्तरीय शालेय सेपकटकरा सुवर्णपदक विजेती शालेय टीम समरजीत कदम, संकेत बिले,वरद पाटील,वैजीनाथ उन्हाळे ,अथर्व तोडकरी यांचा सुवर्णपदक मिळवल्याने विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात विनोदी भारूडकार संदिप मोहिते व आण्णा चव्हाण यांनी आपल्या जुगलबंदी भारूडातून प्रबोधन केले.कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांना ग्रंथाचे वाटप करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर तोडकरी व आभार सूर्यकांत तोडकरी यांनी मानले.

