मंगळवेढा पशुसंवर्धन विभागाकडून लाळ खुरकत आजाराचे लसीकरण सुरू- डॉ.सुहास सलगर
जनावरांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यात सध्या थंडी मोठ्या प्रमाणात असून थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांना लाळ्या खुरकूत या संसर्गजन्य रोगाची लागण होत असते प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मंगळवेढा पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना लसीकरण केले जात आहे त्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रभारी तालुका पशुधन विस्तार अधिकारी डॉ सुहास सलगर यांनी केले आहे.
मंगळवेढा पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाचा शुभारंभ नंदेश्वर येथे मंगळवेढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डॉ सुहास सलगर व स्थानिक शेतकरी व आजी-माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
डॉ. सुहास सलगर यांनी पशुपालकांना घ्यावयाच्या काळजीबद्दलही मार्गदर्शन केले लाळ्या-खुरकूत हा संसर्गजन्य रोग आहे. ऐन हिवाळ्यात याची लागण जनावरांना होत असते.जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्यतो होत नाही.लाळ खुरकूत साथीचा आजार हिवाळ्यात या रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात होते. मात्र शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे इतर जनावरांनाही याची लागण होते. शिवाय काळजी घेताना लहान बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने या आजाराची तीव्रताही वाढत जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळी लसीकरण आणि योग्य ती काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
लाळ खुरकुताची लक्षणे-
लाळ खुरकुताची लागण झाली की जनावरांला ताप येतो नियमितपणे चारा खात नाही पाणी पिणे बंद करते तर दुभते जनावर असेल तर दुधाचे प्रमाणही कमी होते.या दरम्यानच्या काळात जनावराच्या तोंडाच्या आतील भागाला तसेच जीभेवर फोड येतात. जनावरांच्या तोंडातून लाळ गळते जनावरांच्या दोन्ही पायात जखमा होतात .

