आंधळगावच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही -आ.आवताडे
आ आवताडे यांच्याकडून सरपंच लव्हाजी लेंडवे,अशोक लेंडवे यांचा सत्कार
मंगळवेढा प्रतिनिधी
आंधळगावाच्या विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही तसेच शासनाच्या विविध योजना गोर-गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवून सामान्यांच्या जीवनात बदल घडवावा असे आवाहन आ समाधान आवताडे यांनी केले.
मंगळवेढा येथील आ.आवताडे संपर्क कार्यालयात आंधळगावचे लोकनियुक्त सरपंच लव्हाजी लेंडवे व अशोक लेंडवे यांचा सत्कार आ. आवताडे यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी ते म्हणाले गावाचा विकास करताना पक्ष पार्टी, गट तट,जात पात न पाहता आपण निधी देत असून यापूर्वी ही आंधळगावच्या विकास कामांसाठी निधी दिला आहे भविष्यात देखील मोठ्या प्रमाणात निधी देऊ असे सांगितले.
यावेळी दीपक पवार,दीपक सुडके,स्विय सहाय्यक रावसाहेब फटे,महादेव लेंडवे,सहदेव लेंडवे,बाळासाहेब लेंडवे,धनंजय लेंडवे गुरुजी आदी उपस्थित होते.

