Take a fresh look at your lifestyle.

आंधळगाव येथील अवैद्य धंदे बंद करण्याचा ठराव

पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

684

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
         मंगळवेढा तालुक्यातील
आंधळगाव येथील अवैद्य दारू, जुगार, मटका पूर्णपणे बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला असून याची कठोर अमलबजावणी करण्यासाठी मंगळवेढा पोलिस ठाण्याला ठरावाची प्रत दिली जाणार आहे.तसेच परमिट रूम बिअर शॉपी साठी ना हरकत मागणाऱ्यांचे अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती सरपंच लव्हाजी लेंडवे यांनी सांगितले.
मंगळवेढा तालुक्यातील आंधलगाव येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच लव्हाजी लेंडवे होते.
ग्रामसभेत ग्रामसेवक अविनाश मोरे यांनी मोदी आवास योजना व इतर योजनाची माहिती दिली.यावेळी तलाठी बालसाब शेख यांनी मोबाईल मधील पीक पाहणी द्वारे पिकाची नोंदणी करून घ्यावी भविष्यात वादळ, वारे पाऊस तसेच नैसर्गिक रित्या शेतीचे नुकसान झाल्यास ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणे द्वारे पिकाची नोंद सातबारा वर लावलेली आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असे सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी बी.के पडवळे यांनी गोल्डन कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड या कार्डाची माहिती देऊन सर्व नागरिकांनी हे कार्ड काढून घ्यावे या कार्डमार्फत १३५६ आजारावर पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळत असल्याची माहिती दिली.

यावेळी रवीकांत नवले यांनी  बिअर शॉपी ची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली. जिल्हा प्राथमिक शाळेच्या परिसरात शाळेच्या परिसरातील दारू विक्री, मटका गुटखा विक्री बंद करण्याची मागणी केली त्यावेळी गावात होणारी अवैध दारूविक्री, मटका, जुगार गुटखा बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. यावेळी सुनील वेळापुरे यांनी आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्ण वेळ निवासी डॉक्टर मिळावा, ग्रामपंचायत पाणीपुरवठा पाण्याची तपासणी वेळोवेळी करवी अशी मागणी केली.वाडी वस्तीवर कोणत्याही सुविधा नसल्याने घरपट्टी व पाणीपट्टी ही माफ करण्यात यावी अशी मागणी अंकुश लेंडवे, सत्यवान लेंडवे, बाळासाहेब लेंडवे यांनी केली.

या सभेवेळी माजी जि प सदस्य शिवाजीराव नागणे, काशिनाथ पाटील, महादेव माळी,दामाजीचे संचालक दिगंबर भाकरे,उपसरपंच भारत लेंडवे, ग्रा. सदस्या सीमा अवताडे, सुरय्या शेख, वर्षा शिंदे
समाधान लेंडवे, सुयोग बनसोडे, गणेश नागणे, संतोष शिंदे, दिगंबर माळी, सुनील शिंदे, शिवाजी माळी, बाळासाहेब डांगे, निजाम शेख, सत्यवान लेंडवे, अंकुश डांगे, चंद्रकांत जाधव, इस्माईल मुलानी, आरोग्य सहाय्यक सुनील जाधव, रामेश्वर अवताडे, बंडोपंत लेंडवे, पोपट भाकरे, आप्पासो स्वामी, धोंडराम नागणे, तायप्पा माळी, आबासो माळी, सुनील वेळापुरे, अनिल चव्हाण, सुखदेव नागणे, माशिम मुलाणी, निजाम सुतार, दिगंबर लेंडवे,लिपिक चैतन्य गाडूळे व शिपाई बाळासाहेब रणदिवे आदी उपस्थित होते.

 

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More