Take a fresh look at your lifestyle.

ट्रकचा हप्ता थकल्याने, नवर्‍यास पळवून नेल्याची पत्नीची पोलीसात तक्रार

डोंगरगाव येथील घटना,तिघाविरुध्द गुन्हा दाखल

571

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

   तू आमचेकडून चालविणेकरिता घेतलेल्या ट्रकचे हप्ते का भरले नाहीत? तू आमचा ट्रक आम्हाला परत दे असे म्हणून बाळासो बाबासो सलगर (वय 33 रा.डोंगरगाव) याला जबरदस्तीने मोटर सायकलवर बसवून पळवून नेल्याप्रकरणी रावण सिध्देश्वर चव्हाण (वय 36) व अज्ञात दोघे (रा.आवंढी ता.जत. जि.सांगली) या तिघाविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेची हकीकत अशी,यातील फिर्यादी अश्विनी बाळासो सलगर (वय 23 रा.डोंगरगाव) यांचे पती बाळासो बाबासो सलगर (वय 33) यांना दि.16 डिसेंबर रोजी रात्री 11.30 च्या दरम्यान ओळखीचे आरोपी रावण सिध्देश्वर चव्हाण व त्यांचे सोबत आलेले अन्य अनोळखी दोन व्यक्तींनी डोंगरगाव येथे येवून तू आमचेकडून चालविणे करिता घेतलेल्या ट्रकचे हप्ते का भरले नाहीत? तु आम्हाला आमचा ट्रक परत दे, तू जो पर्यंत ट्रकचे हप्ते भरणार नाही व ट्रक देत नाही तो पर्यंत आम्ही तुला सोडणार नाही असे म्हणून वरील आरोपीने फिर्यादीच्या पतीस जबरदस्तीने मोटर सायकलवर बसवून पळवून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार विभुते हे करीत आहेत.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More