Take a fresh look at your lifestyle.

राहुल शहा यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, 4 जानेवारी पर्यंत तात्पुरता अंतरिम जामीन मंजूर

विद्या विकास मंडळ संस्था बनावट सही व चेंज रिपोर्ट प्रकरण

1,001

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

          श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या सभासदांच्या बोगस सही प्रकरणात गेल्या दोन महिन्यापासून फरार असलेले आरोपी राहुल शहा यांना मुंबई उच्च न्यायालयाने चार जानेवारीपर्यंत दिलासा दिला असून त्यांचा तात्पुरता अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यामुळे राहुल शहा यांना 4 जानेवारीपर्यंत आता मंगळवेढा शहर ग्रामीण भागात सर्व ठिकाणी मोकळे पणाने वावरता येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवेढा तालुक्यातील विद्या विकास मंडळ या संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती शुभदा सुभाष शहा यांना अध्यक्ष करणेसाठी 29ऑगस्ट2021 रोजी श्री संत दामाजी महाविदयालय मंगळवेढा येथे संस्थेची कोणतीही सभा झालेली नसताना सभा झाल्याचे बोगस दाखवुन त्यावर बनावट सहया केल्या.तसेच धर्मादाय उपायुक्त यांचेकडे पाठविलेले संमती पत्र व नाहरकत पत्र यावरही खोट्या सहया करून कागदपत्रे खरी आहेत असे भासवुन धर्मादाय उपायुक्त यांचेकडे सादर करून चेंज रिपोर्ट मंजुर करुन घेतल्याप्रकरनी संस्थेचे अध्यक्ष श्रीमती शुभदा सुभाष शहा,राहुल सुभाष शहा,उपाध्यक्ष बाबासाहेब उर्फ भिमराव विठठल पाटील ,सचिव किसन जगन्नाथ गवळी यांचेविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे सचिव ऍड रमेश दीनानाथ जोशी यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.त्यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता.परंतु त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे राहुल शहा यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
दरम्यान या प्रकरणातील उर्वरित तीन संशयित आरोपी शुभदा शहा,किसन गवळी, बाबासाहेब पाटील यांनी अटकपूर्व अर्ज अद्याप दाखल केला नाही लवकरच पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयात हे तिघेजण आपला जामीन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More