Take a fresh look at your lifestyle.

श्री संत दामाजी शिक्षक पतसंस्थेच्या नूतन चेअरमन पदी  विष्णू आसबे व व्हाईस चेअरमन पदी  धनाजी नागणे

340

- Advertisement -

मंगळवेढा  प्रतिनिधी
श्री संत दामाजी प्राथमिक शिक्षक सहकारी  पतसंस्थेच्या नूतन चेअरमनपदी  विष्णू आसबे व व्हाईस चेअरमनपदी धनाजी नागणे  यांची बिनविरोध झाली आहे.
  अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक एस .बी.लिंबोळे  होते .श्री संत दामाजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या . मंगळवेढा या पतसंस्थेची स्थापना 1 जून 2006 रोजी स्व. अरुण डोरले गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तेव्हापासून 2023 -24 पर्यंत पतसंस्थेचा कारभार अतिशय काटकसरीने संचालक मंडळाने चालविला आहे. नूतन चेअरमन विष्णू आसबे बोलताना म्हणाले, सभासदांच्या हिताचे निर्णय श्री संत दामाजी पतसंस्था संचालक मंडळाने आजपर्यंत यशस्वीरित्या घेऊन तालुक्यात अस्तित्वात असलेल्या इतर पतसंस्थेशी तुलना करता कर्जवाटपात आघाडी घेत असताना संस्थेच्या स्थापनेपासून संचालक मंडळ एकही रुपया भत्ता न घेता कारभार करण्याचे अभिवचन देऊन ही पतसंस्था आदर्शवत काम करेल अशी ग्वाही दिली .
नूतन व्हा . चेअरमन धनाजी नागणे यांनी मनोगतात सांगितले की मंगळवेढा तालुक्यातील इतर शिक्षक पतसंस्था यांच्या तुलनेने सहा लाख रुपये कर्ज मर्यादा अगदी कमी कालावधीमध्ये वाटप करण्याचे तसेच तीस हजार रुपये प्रापंचिक कर्ज व शैक्षणिक कर्ज वाटप करून सभासद हितकारी निर्णय घेतलेले आहेत व त्याची अंमलबजावणी सुरू आहे.
श्री संत दामाजी शिक्षक पतसंस्थेच्या आदर्श पारदर्शक कारभाराची माहिती व लेखाजोखा मार्गदर्शक संजय चेळेकर यांनी दिली.
     याप्रसंगी मंगळवेढा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी तानगावडे,आदर्श शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर सावत ,शिक्षक संघाचे ज्येष्ठ सल्लागार कांताराम बाबर ,सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे संपर्कप्रमुख लक्ष्मण घुले, मंगळवेढा तालुका शिक्षक संघाचे  सरचिटणीस राजेंद्र केदार,  तालुका शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष कविराज दत्तू,  संचालक शिवाजी  गणपाटील, धनाजी जगदाळे,धर्मराज जाधव , भीमाशंकर तोडकरी,  प्रदीप यादव,  चंद्रकांत माने,  रावजी कांबळे, तज्ञ संचालक गौतम दोडके व रामचंद्र दोलतोडे, संचालिका सुनिता काकडे , अनिता भिंगे, सुखदेव सांगोलकर, राजेश माने,  निवास माळी, अशोक लेंडवे, हरिभाऊ लोखंडे उपस्थित होते. सचिव  मोहन लेंडवे यांनी आभार मानले.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More