Take a fresh look at your lifestyle.

महारष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी मारापुरचे सरपंच विनायक यादव यांची निवड

462

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी

महारष्ट्र राज्य स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी मारापुरचे लोकनियुक्त सरपंच विनायक माधवराव यादव यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतच्या निवडीचे पत्र संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील यांनी दिले आहे.

अहमदनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत स्थरावरील यादव यांचे कार्य बघुन त्यांची निवड केली आहे.यादव हे माणगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असून त्यांनी यापूर्वी देखील ग्रामपंचायत मधे काम केले आहे. ग्रामीण भागाचा विकास होण्याच्या दृष्टीने सरपंच सेवा संघ कार्यरत आहे.

          सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या प्रथम नोंदणीकृत सरपंच संघटना असून ग्रामविकासात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सरपंचांची राज्यात बांधणी असलेली संघटना आहे. शासन स्तरावर अडचणी व ग्रामिण भागाला विविध शासकिय योजनेचा फायदा जनतेला करून देन्यासाठी याचा उपयोग होणार आहे. निवडीनंतर यादव यांचा आ समाधान आवताडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला 

        सरपंच सेवा संघ संघटनेमार्फत तालुक्यातील सरपंचांना एकजूट करून त्यांच्या तसेच जनतेच्या अडचणी सोडविण्यावर भर देणार असल्याचे यादव यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल उद्योजक संजय आवताडे,माजी सरपंच माधवराव यादव,चेअरमन राजकुमार यादव,पो. नि. मनोजकुमार यादव,उपसरपंच अशोक आसबे, तंटामुक्ती अध्यक्ष भगवान आसबे,यांच्यासह विविध स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले. 

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More