Take a fresh look at your lifestyle.

जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवून विकासकामांना प्राधान्य द्या -प्रशांत परिचारक

लक्ष्मी दहिवडी ग्रामपंचायत नूतन सरपंच व सदस्यांचा परिचारक यांनी केला सरकार

360

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवून लोकहिताच्या कामांना प्राधान्य द्यावे.गावच्या सर्वांगीण विकासासाठी गट तट बाजूला ठेवून गावाचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी नियोजन करा तसेच निधी साठी आवाज द्या मदतीसाठी सदैव तुमच्यासोबत राहू असे आश्वासन माजी आ प्रशांत परिचारक यांनी दिले.

         लक्ष्मी दहिवडी येथील नूतन सरपंच व सदस्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.यावेळी परिचारक म्हणाले,लक्ष्मी दहिवडी सारख्या मोठ्या गावात जनतेतून सरपंच होणे ही भा गोष्ट असून जनतेने टाकलेली जबाबदारी नूतन पदाधिकारी यांनी प्रामाणिक पने पार पाडावी. ग्रामपंचायतीला थेट निधी येत असल्याने कामे करण्यास संधी असून त्याचा फायदा जनतेसाठी केल्यास गावाचा कायापालट होणार आहे. निधी साठी माझ्याकडुन कायम सहकार्य राहील असे त्यांनी सांगितले.

         यावेळी लोकनियुक्त सरपंच अनिल पाटील,नूतन सदस्य व बाजार समिती चे संचालक प्रकाश जुंधळे, बजरंग शिंगाडे, श्रीकांत साळे, महेश स्वामी, डॉ. प्रशांत पाटील, मनोहर लिगाडे, दत्ता कोळेकर, सुत गिरणीचे संचालक पप्पू स्वामी,दिलीप राजमाने, ॲड.शिवानंद पाटील, भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन बोडके,माजी सदस्य रामेश्वर जुंदळे,नागेश गुरव,मनोहर पाटील, नितीन लिगाडे आदी उपस्थित होते.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More