नागरिकांना मूलभूत सोईसुविधा देण्यासाठी आ.समाधान आवताडे कटिबध्द-सोमनाथ आवताडे
गणेशवाडी कदम वस्ती रस्त्याचे कामाचे भूमिपूजन
मंगळवेढा प्रतिनिधी
कोणतीही राजकीय अभिलाषा समोर न ठेवता सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सोई सुविधा देण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आ समाधान आवताडे नेहमी प्रयत्नशील असल्याने रस्त्या बरोबरीने गणेशवाडी गावातील इतर प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही माजी सभापती सोमनाथ आवताडे यांनी दिली.


गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा सांगोला महामार्ग ते कदम वस्ती (गणेशवाडी) हा रस्ता आ समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मंजूर झाल्याने त्या कामाचे उद्घाटन युवक नेते सोमनाथ आवताडे व ग्रामविकास अधिकारी धनंजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले.





त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, तालुक्यात रस्त्यांच्या कामासाठी कोट्यावधींचा निधी मिळत आहे या माध्यमातून वाड्यावर त्यावरील रस्ते मजबूत होत आहेत त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होत आहे रस्त्यांची कामे होताना नागरिकांनी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करून घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी सरपंच हरिभाऊ वाकडे, संजय कदम, पंडित तानगावडे, अंबादास कदम, डॉ, सुभाष तानगावडे,अनिल मोरे,ज्ञानु कदम, बाबुराव कदम,मेजर वाकडे,जगन्नाथ गायकवाड आदी उपस्थित होते.

