सीताराम कारखान्याची आघाडी
चालु गळीत हंगामाचा2500चा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - डॉ. राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड
मंगळवेढा प्रतिनिधी
पंढरपूर, मंगळवेढा व सांगोला या तिन्ही तालुक्याच्या मध्यवर्ती भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी संजीवनी असलेल्या खर्डी येथील सीताराम महाराज साखर कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरु असून या हंगामात पहिल्या10 दिवसाच्या मस्टरमधील गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन 2500 रुपये प्रमाणे पहिला हप्ता संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांनी दिली.

शासनाच्या आदेशानुसार 1 नोव्हेंबर पासून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यात आला होता. यानुसार गाळप झालेल्या ऊसाला पहिला हप्ता म्हणून 2500 रुपये प्रतिटन याप्रमाणे धनश्री बँकेत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. चालू वर्षी कारखान्याचे विस्तारीकरण झाले असून दररोज साधारणपणे 3500 मे. टन क्षमतेने ऊसाचे गाळप सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उच्चतम ऊसदर देण्याची परंपरा कायम ठेवणार आहे.

कारखान्याचा गळीत हंगाम सक्षमपणे सुरु असून चालू गळीत हंगामात 4 लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणा नियोजनबद्धरीत्या काम करीत आहे. ठरविलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला ऊस सीताराम महाराज साखर कारखान्याला गाळपासाठी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे मुख्य प्रवर्तक तथा धनश्री व सीताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे.



