Take a fresh look at your lifestyle.

धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा.शोभाताई काळुंगे तर व्हा. चेअरमन पदी शांताबाई धायगोंडे 

331

- Advertisement -

मंगळवेढा  प्रतिनिधी
      मंगळवेढा तालुक्यातील नावाजलेली व हजार कोटीच्या ठेवी असलेल्या धनश्री महिला पतसंस्थेच्या 2023- 24 ते 2028- 29 या कालावधीसाठी चेअरमन पदी शोभाताई काळुंगे यांची तर व्हाईस चेअरमन पदी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

धनश्री महिला पतसंस्थेच्या संचालक मंडळाची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे.याबाबतचे पत्र दिनांक 27ऑक्टोबर रोजी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर किरण गायकवाड यांच्याकडून देण्यात आले. त्यानुसार मंगळवार दिनांक 7नोव्हेंबर रोजी संस्थेच्या कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता नूतन संचालक मंडळाची सभा घेण्यात आली. सदर सभेमध्ये चेअरमन पदासाठी प्रा.शोभा शिवाजीराव काळुंगे तसेच व्हा.चेअरमन या पदासाठी शांताबाई श्रीशैल्य धायगोंडे यांचा प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे संस्थेच्या नूतन चेअरमन म्हणून प्रा.शोभाताई काळुंगे व व्हाईस चेअरमन म्हणून शांताबाई धायगोंडे यांची अविरोध निवड करण्यात आली.सहाय्यक निबंधक पी.सी. दुरगुडे यांनी अध्यासी अधिकारी तसेच सहाय्यक म्हणून सचिन जाधव यांनी काम पाहिले.             

   यावेळी नूतन संचालिका म्हणून दिपाली पाटील, सुनीता नागणे, संगीता सावजी, सुरेखा कलूबरमे, पूजा शिंदे,वेणूबाई रोकडे, विद्या जावीर,कल्पना गडदे मनीषा कुंभार यांची संचालक म्हणून अविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर नूतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नूतन चेअरमन प्रा. शोभाताई कालुंगे म्हणाल्या, संस्थेच्या योग्य व पारदर्शी कारभारामुळे संस्थेत हजारो कोटी ठेवी झाल्या असून आम्ही विश्वस्त म्हणून काम पाहत आहोत.संस्थेने गरजू व पात्र कर्ज दाराला मदत केल्याने त्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाल्याने संस्थेबद्दल ठेवीदार व कर्जदार यांचा विश्वास वाढत असून संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने आहे.

        यावेळी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, सीताराम कारखान्याच्या सीईओ डॉ.राजलक्ष्मी गायकवाड,शिवाजीराव पवार,किसन सावजी,प्रभाकर कलुबरमे कल्याण रोकडे, ज्ञानदेव जावीर,ईश्वर गडदे, उमाकांत कनशेट्टी,गणेश शिंदे, श्रीशैल धायगुडे, व्यवस्थापिका सुनीता सावंत आदी उपस्थित होते.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More