Take a fresh look at your lifestyle.

आवताडे शुगर कडून ऊस दराचा पहिला हप्ता 2551 रुपये देणार – चेअरमन संजय आवताडे

कामगारांना 8.33 % बोनस देणार पहिल्या ११ साखर पोत्यांचे पुजन संपन्न

254

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी
नंदुरच्या आवताडे शुगर अँण्ड डिस्टीलरीज प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याने चालू हंगामात उसाचा पहिला हप्ता 2551 रुपये तसेच कामगारांना 8.33% बोनस देणार असल्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी सांगितले.

       शुक्रवार दिनांक 3 रोजी कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांच्या उपस्थितीत व कारखान्याचे टेक्निकल विभागाचे व्यवस्थापक सुहास शिनगारे व त्यांच्या पत्नी गौरी शिनगारे यांचे हस्ते होमहवन व सत्यनारायण महापूजा करून डिस्टिलरी विभागाचा द्वितीय बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आला.
यावेळी बोलताना चेअरमन संजय आवताडे म्हणाले की, आ. समाधान दादा आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली फॅबटेक समूहातून हा कारखाना खरेदी करून आवताडे शुगर मध्ये रूपांतरित केल्यानंतर पहिल्या गळीत हंगामामध्ये २३५० रुपये ऊस दर देत खाजगी कारखानदारी मध्ये सर्वाधिक दर दिला होता आम्ही हा कारखाना केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला असून या कारखान्यामधून आम्ही कोणताही स्वार्थ ठेवला नाही गेल्या गळीत हंगामामध्ये कारखान्याचे सर्व कर्मचारी, ऊस पुरवठादार, ऊस वाहतूकदार, ऊसतोड मजूर व कारखाना प्रशासनाने मन लावून व प्रामाणिक काम केल्यामुळे गतवर्षीचा गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडला असून चालू गळीत हंगाम देखील यशस्वीरित्या पार पाडून शेतकऱ्यांचे समाधान होईल असा जास्तीत जास्त दर शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न असणार आहे.तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आपला ऊस आवताडे शुगर ला घालून सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन संजय आवताडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

         यावेळी मंगळवेढा मार्केट कमिटीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, डिस्टिलरी मॅनेजर संभाजी फाळके, विजय माने, पप्पु काकेकर, शाम पवार, चंदू गोडसे, गोपाळ पवार, श्रीकांत पवार, मोहन पवार, बजीरंग जाधव, राहुल नागणे, तोहीद शेख, डाॅ. जगताप, रमेश टाकणे यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More