खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे यांच्या वाढदिवसानिमीत्त संत दामाजीनगर मध्ये महिला बचत गटांना वस्तू वाटप
1 कोटी 65 लाखाच्या विविध विकास कामाचे उदघाटन
मंगळवेढा प्रतिनिधी
खरेदी विक्री संघाचे चेअरमन व दामाजीचे संचालक सिध्देश्वर आवताडे यांच्या वाढदिवसानिमीत्त संत दामाजीनगर ग्रामपंचायतीच्या वतीने २० महिला बचत गटांना दप्तर ठेवण्यासाठी कपाट व सतरंजी देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डीसीसी चे माजी व्हा चेअरमन बबनरावजी आवताडे,सुनंदाताई आवताडे यांच्या हस्ते व बाजार समिती चेअरमन सुशील आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले.
महिलांना स्वयंपूर्ण होण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी, महिलासाठी लकी ड्रॉ काढण्यात आला.त्यामध्ये बक्षिस स्वरुपात पिठाची चक्की, पैठणी, बजाज मिक्सर,स्टँड फॅन व ईलेक्ट्रीक शेगडी विजेत्या महिलाना देण्यात आल्या.या कार्यक्रमाला 200पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या.बचत गटाच्या महिलांसाठी अनोखा कार्यक्रम ग्रामपंचायत ने आयोजित केल्याने महिला वर्गातून कौतुक होत होते.

या कार्यक्रमाच्या वेळी संत दामाजीनगरचे सरपंच जमीर(भाई)सुतार,सदस्य आण्णा आसबे सोमनाथ, शिंदे, दिलीप उगाडे, संजय माळी, विजय जावळे लखन बाबर, मालाबाई बाबर अनिता माळी नंदा जावळे अरुणाताई घाडगे, दिपाली शिंदे सलमा सुतार व बचतगटाचे अधिकारी व ग्रामविकास अधिकारी अरूण मोरे आदी उपस्थित होते.
तसेच दुसऱ्या कार्यक्रमानिमित्त संत दामाजीनगर मध्ये 1 कोटी 65 लाखाच्या विविध विकास कामाचे उदघाटन मार्केट कमीटीचे सभापती सुशिल आवताडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या विकास कामांमध्ये प्रामुख्याने संत दामाजीनगर मधील शिवाजीनगर शाळा खोली बांधकाम, पेवर ब्लॉक, अंगणवाडी कंपाऊड वाल, अंगणवाडी मध्ये पाण्याची सोय, स्वच्छ भारत अभियान 14 वा वित्तआयोग 15 वा वित्तअयोग मधून रस्ते गटार, स्ट्रिट लाईट सार्व.शौच्छालय बांधकाम व दुरूस्ती, विश्रामगृह दुरूस्ती व ग्रामनिधीच्या विकास कामाचा समावेश आहे.
यावेळी संत दामाजीनगरचे सरपंच जमीर(भाई)सुतार ,सदस्य आण्णासाहेब आसबे, सोमनाथ शिंदे ,लक्ष्मण गायकवाड, विजय जावळे बसवेश्वर माळी ज्ञानेश्वर वाघमारे कमलेश माळी, विजय जावळे ,बसवेश्वर माळी आबा पांढरे जिवन खांडेकर ,योगेश चव्हाण ,शुभम वाकडे, अनिल जगताप, मोहन खांडेकर सागर वाघमारे, लखन बाबर, सुनिल आवताडे, बबलु माने, प्रवीण कोंडुभैरी आदीजण उपस्थित होते.

