Take a fresh look at your lifestyle.

आरक्षण मिळेपर्यंत शासनाचा कोणताही कर न भरण्याची मराठा बांधवांनी घेतली शपथ

मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात 100%बंद यशस्वी

347

- Advertisement -

 

मंगळवेढा  प्रतिनिधी

मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील बनत असताना देखील सरकार चालढकल करत असल्याने मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला मंगळवेढा व ग्रामीण भागात 100%प्रतिसाद मिळाला. व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदवला.तसेच आरक्षण मिळेपर्यंत शासनाचा कोणताही कर भरणार नाही तसेच शासनाच्या निषेधार्थ काळी दिवाळी करण्याची शपथ मंगळवेढा येथील सकल मराठा बांधवांनी घेतली.

            दिनांक 24पासून मराठा आरक्षणासाठी अंतरावली येथे मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. त्या उपोषणाच्या समर्थनार्थ मंगळवेढा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या आठ दिवसापासून विविध माध्यमातून आंदोलन सुरू ठेवत साखळी उपोषण सुरू आहे. सध्या मनोज जरांगे यांची अन्न पाण्यावाचून शारीरिक स्थिती नाजूक आहे. व सरकार आरक्षणाच्या बाबतीत केवळ फसव्या घोषणा करीत आरक्षण देण्यास पळवाटा काढत असल्यामुळे आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवेढा येथील समाज बांधवांनी दिनांक 31 रोजी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात बंदची हाक दिली होती. त्या हाकेला उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात व्यापारी व इतर छोटे मोठे व्यावसायिक सहभागी होऊन आपली दुकाने बंद ठेवत उपोषणाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला. येथील दामाजी चौकात सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी मराठा बांधव एकत्रित येत सरकारच्या निषेधाच्या च्या घोषणा दिल्या. तसेच सरकारकडून श्रेयवादासाठी जाणीवपूर्वक आरक्षण देण्यास चालढकल केली जात आहे. जर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवित काही बरे वाईट झाल्यास त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतीलआम्हाला जरांगे पाटील व आरक्षण दोन्ही पाहिजे असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. यावेळी आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी आरक्षण मिळेपर्यंत शासनाचा कोणताही कर न भरता असहकार धोरण राबविले जाईल.

           तसेच सरकारकडून आरक्षणासाठी होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ येणारी दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरी केली जाईल व ज्या दिवशी आरक्षण मिळेल त्यादिवशी दिवाळी मोठ्या प्रमाणात धूमधडक्यात साजरी करण्याची शपथ यावेळी मराठा बांधवांनी घेतली. आजच्या या मंगळवेढा बंद आंदोलन दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. आंदोलन शांततेत पार पडले सध्या शालेय मुलांच्या परीक्षा सुरू असून एसटी महामंडळाच्या बसेस सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात हाल झाले तर काही वर्गांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आले आहेत. मंगळवेढा पोलिसांनी शहर व ग्रामीण भागात पो नी रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्था चोख ठेवली असून सर्वत्र शांततेत आंदोलन सुरू आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More