दामाजी कडून दिवाळीसाठी मागील हंगामातील जादाचे 51रू शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा – चेअरमन शिवानंद पाटील
एफ आर पी पेक्षा जादा दिले 54.55रुपये
मंगळवेढा प्रतिनिधी
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या मागील हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना जादा ऊसाचे बिल रु51 प्र.मे.टन प्रमाणे बँकामध्ये वर्ग केले असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.
सन 22-23 हंगामातील एफआरपी रु 2296.45 असुन हंगामात अखेरपर्यंत गळीतास आलेल्या संपुर्ण ऊसास रु2300 प्रमाणे बील यापुर्वीच हंगाम बंद होताना दिले आहे. दुष्काळी स्थिती पाहता शेतकऱ्यांच्या कष्टाचा विचार करुन येणाऱ्या दिवाळी सणासाठी आणखीन 51 प्रमाणे जास्तीचे बील दिले असून एफआरपी पेक्षा रु54.55इतके जास्तीचे बील देण्याचे काम या संचालक मंडळाने केले आहे. सदर रक्कम धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, मंगळवेढा व धनश्री पतसंस्थेच्या सर्व शाखामध्ये, बँक आफ इंडिया शाखा मंगळवेढा, जिजामाता महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था-मंगळवेढा, रतनचंद शहा सहकारी बँक, मंगळवेढा इत्यादी बँकां-पतसंस्थामध्ये सदरची रक्कम संबंधीत शेतकÅयांचे सोईनुसार वर्ग केल्याची माहिती प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली.
पुढे बोलताना चेअरमन श्री शिवानंद पाटील म्हणाले, गळीत हंगाम23-24चा हंगाम चालू झालेला असून या हंगामाकरिता ऊसाच्या वाढीसाठी पोषक असा पाऊस झाला नसल्याने ऊसाची वाढ योग्य प्रकारे झालेली नाही। त्यामुळे हा हंगाम आव्हानात्मक असला तरी या गळीत हंगामामध्ये चार लाख मे.टन गाळपाचे उद्षि्ट संचालक मंडळाने ठेवलेले आहे. तसेच या हंगामामध्ये गळीतास येणा-या ऊसास इतर कारखान्याचे बरोबरीने ऊस दर देणार आहे. गळीताचे हे उद्षि्ट पूर्ण करणेसाठी सभासद- शेतक-यांनी आपला ऊस दामाजी कारखान्यासच गळीतास द्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन तानाजीभाऊ खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तु, गौरीशंकर बुरकुल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, यांचेसह कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते.
चेअरमन शिवानंद पाटील, व्हा.चेअरमन तानाजीभाऊ खरात व संचालक मंडळाने ऐन दिवाळीचे तोंडावर एफआरपी पेक्षा जास्तीचे ऊस बील दिल्याने तालुक्यातील शेतकरी आनंदी व समाधानी राहुन दामाजी कारखान्यावरील विश्वास वाढला आहे.त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी दामाजी कारखान्यास ऊस पाठविणेसाठी प्राधान्याने विचार करीत आहेत असे मत सिद्धापुर चे प्रगतशिल बागायतदार शिवगोंडा पाटील यानी व्यक्त केले.

