Take a fresh look at your lifestyle.

….अखेर भोसे गावच्या त्या ग्रामविकास अधिकाऱ्याची उचलबांगडी

मराठा आरक्षण ठराव छेडछाड प्रकरण भोवले

1,403

- Advertisement -

 

मंगळवेढा  प्रतिनिधी

मंगळवेढा येथील भोसे ग्रामपंचायत च्या मासिक बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी केलेल्या ठरावाला विरोध करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी अविनाश मोरे याची गटविकास अधिकाऱ्यांनी अखेर उचल बांगडी केली असून पुढील आदेश येईपर्यंत एस बी शिंदे यांच्याकडे येथील पदाचा कार्यभार सोपवला आहे. ग्रामविकास अधिकाऱ्याला गावबंदी करून त्याच्या कारभाराच्या चौकशीची मागणी ग्रमस्थानी केली होती.

        भोसे ता. मंगळवेढा येथे दिनांक 31रोजी मतदार यादी चे वाचन करन्यासाठी तसेच मोदी आवास योजनेची माहिती देण्यासाठी विशेष् ग्रामसभेचे आयोजन श्रीराम मंदिरात सकाळी अकरा वाजता करण्यात आले होते या ग्रामसभेचे अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता ढोणे या होत्या याप्रसंगी सकल मराठा समाजास आरक्षण देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत असलयाने जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना गाव बंदी करण्याचा ठराव उपसरपंच बाळासाहेब काकडे यांनी मांडला या ठरावास सर्व ग्रामसभेने संमती दिली. दरम्यान 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक ग्रामसभेत येथील ग्रामपंचायत सदस्यांनी मराठा समाजास आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्याचा ठराव मांडला होता सर्व सदस्यांनी ठराव मांडून देखील एकमत दर्शवून देखील ग्राम विकास अधिकारी अविनाश मोरे यांनी मात्र जरी सर्व सदस्यांनी ठराव घेतला असला तरी ग्रामविकास अधिकारी या नात्याने मी सहमत नसल्याचे मत नोंदवल्याने गावामध्ये एकच गदारोळ माजला होता. ग्रामविकास अधिकाऱ्याच्या प्रतिमेला जोडोमार आंदोलन करण्यात आले होते. ठरावास विरोध करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱयास गावकऱ्यांनी गाव बंदी केल्याने परिस्थितीचे गंभीर्य ओळखून मंगळवेढ्याचे गटविकास अधिकारी एस जे पाटील यांनी तातडीने भोसे येथील ग्राम विकास अधिकारी पदाचा पदभार पुढील आदेश येईपर्यंत एस बी शिंदे यांच्याकडे सोपवला आहे.

         या ग्रामसभेत ग्रा. सदस्य उमेश काटकर यांनी भोसे ग्रामपंचायतच्या सन 2021 पासून झालेल्या कामाच्या चौकशीची मागणी केली ग्रामपंचायत सदस्य अशोक भगरे यांनी भोसे आरोग्य केंद्रातील रिक्त पदाचा प्रश्न मांडून भोसे आरोकेंद्रातील रिक्त पदे भरण्याची मागणी केली माजी सभापती तानाजी काकडे यांनी मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळ यादीत समावेश नसल्याने तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय होत असून हा अन्याय दूर करण्यासाठी मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळात समावेश करावा अशी मागणी केल्यानंतर हाही ठराव सर्वांमध्ये घेण्यात आला याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी एस बी शिंदे यांनी मोदी आवास योजनेची सविस्तर माहिती देऊन अर्ज करण्याचे आवाहन केले तलाठी माळी यांनी मतदार यादी वाचन केले. 

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More