मंगळवेढा प्रतिनिधी
पाठखळ मेटकरवाडी ग्रामपंचायती च्या उपसरपंच पदी सिध्देश्वर आवताडे गटाचे तानाजी गोडसे यांची निवड झाली असून त्यांनी प्रतिस्पर्धी प्रदीप पवार यांचा 1मतांनी पराभव केला.
पाटखळ मेटकरवाडी उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया दिनांक 30रोजी पार पडली. उपसरपंच पदासाठी तानाजी गोडसे व प्रदीप पवार यांचे दोन अर्ज दाखल झाले होते.यामध्ये तानाजी गोडसे यांना सहा मते मिळाली व प्रदीप पवार यांना पाच मते मिळाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य 11 यांनी मतदानाचा हक्क बजावला.
ही निवड निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच ऋतुराज बिले व ग्रामसेवक अरुण मोरे यांच्या उपस्थितीत पार पडली. सरपंच ऋतुराज बिले व खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर बबनराव आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन उपसरपंच तानाजी गोडसे यांची निवड झाली. यावेळी पार्टी प्रमुख बिरूदेव गडदे,बापूसाहेब वाघमोडे, उत्तम वाघमोडे,हनुमंत गडदे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खुळे, बंडू काळे,उपसरपंच समाधान गडदे, माळाप्पा कोळेकर,अंकुश खुळे,दिलीप जाधव,भारत(बापू)खुळे,समाधान खुळे,शिवाजी गडदे,तेजस चव्हाण, प्रवीण लेंडवे,विशाल चव्हाण,पप्पू गडदे,दत्ता माने,समाधान पवार, अविनाश खुळे,माऊली कोळेकर, दिगंबर माने,उपस्थित होते.निवडी नंतर तालुक्याचे ज्येष्ठ नेते, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे यांच्या हस्ते खरेदी विक्री संघ येथे गोडसे यांचा सत्कार करण्यात आला.

