Take a fresh look at your lifestyle.

सिताराम महाराज कारखाना 23-24 साठी पहिला हप्ता 2500 रू देणार – डॉ .राजलक्ष्मी गायकवाड

मागील गाळपाचे दिवाळीसाठी 100रुपये जादा देणार

327

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

        सिताराम महाराज साखर कारखान्याना 23-24 साठी पहिला हप्ता रु. 2500प्र.मे.टन देणार असून 22-23मध्ये गाळप झालेल्या उसाला दिवाळीसाठी आणखी 100 रुपये जादा बिल देणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी रविराज गायकवाड यांनी दिली. 

   सिताराम महाराज साखर कारखाना खर्डी लि. कारखान्याचा सन 23-24 चा तेरावा गाळप हंगाम शुभारंभ सोमवार दि 30 रोजी ह.भ.प.जयवंत बोधले महाराज धामणगांवकर यांचे हस्ते कारखान्याचे मुख्य प्रवर्तक व धनश्री परिवारचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे चेअरमन शोभाताई काळुंगे, संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, यादाप्पा माळी, प्रगतशिल बागायतदार शिवाजी घोडके, सिताराम कारखान्याचे संचालक सुयोगभैया गायकवाड, दत्तात्रय सुर्यवंशी,स्नेहलताई मुदगल, दिपाली पाटील, महादेव देठे, माउली जाधव, डॉ. रमेश सिद, सरपंच सिमाताई काळुंगे, प्रकाश काळुंगे, विठठलचे माजी संचालक उत्तमकाका नाईकनवरे, बिभीषण ताड, अविनाश भाऊ चव्हाण, डॉ. रविराज गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

          यावेळी बोलताना डॉ. राजलक्ष्मी गायकवाड म्हणाल्या सिताराम महाराज साखर कारखान्याने गाळप हंगाम 23-24 मध्ये मशिनरीचे आधुनिकीकरण केल्याने दररोज 3500 मे. टन ऊसाचे गाळप होणार आहे. कारखाना आधुनिक डिस्टीलरी प्रकल्प उभा करीत आहे आणि कारखान्यामध्ये हायड्रोजनची निर्मिती होणार आहे. तरी भागातील सर्व ऊस पुरवठा शेतक-यांनी त्यांचा जास्तीतजास्त उस चालुवर्षी गाळपास देवुन सहकार्य करावे असे आवाहन केले. मागील गाळप हंगामात कारखान्यास गाळपास आलेल्या ऊसास कारखान्याने रक्कम 2300रू प्र. मे. टन दर दिलेला असुन दिवाळी सणांसाठी रु.100 प्र. मे. टन चा हप्ता शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा करणार असल्याचे सांगितले. मागील हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतक-यांना एकुण रक्कम रु.2400 प्र. मे.टन प्रमाणे अदा द केली आहे. तसेच माफक दरांत साखर वाटप करणार असल्याचे सांगुन वजनकाटा कोठेही करुन घेवुन यावा असे आवाहन केले.यावेळी कायदे सल्लागार शैलेश हावनाळे, संजय चौगुले, धनश्री मल्टीस्टेटचे मॅनेजर रमेश फडतरे, रवि शिंदे, व्यस्थापिका सुनिता सावंत जनरल मॅनेजर हणमंत पाटील, चिफ इंजिनिअर एस.बी. रोंगे, प्रशासन अधिकारी डी. एम्. सुतार, चिफ केमिस्ट व्ही. एस. नागणे, मुख्य शेती अधिकारी पी. जी. शिंदे, को जन मॅनेजर ए. बी. गाजरे, सिव्हील इंजिनिअर आर. एस. वायदंडे, पर्चेस / सेल्स मॅनेजर एन. पी. कोठावळे, पर्चेस ऑफीसर आर. एन. चेळेकर, स्टोअर किपर डी.जे. नागणे, ई.डी.पी. मॅनेजर टी. बी. पांढरे, फायनान्स अकौंटंट व्ही. एन्. भोसले यांचेसह कारखान्यातील सर्व कर्मचारी,ऊस पुरवठा सभासद शेतकरी, तोडणी वहातुक कंत्राटदार उपस्थित होते. आभार जनरल मॅनेजर हणमंतराव पाटील यांनी केले.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More