मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा प्रहार संघटनेकडून मंगळवेढा शहरात गेली अनेक वर्ष शहरांमध्ये दिव्यांग भवन व्हावे यासाठी प्रयत्नशील असताना दिव्यांग भवन व निधि मंजूर असताना देखील ठेकेदाराकडून काम करण्यास चालढकल होत असल्याने मंगळवेढा शहरातील दिव्यांग एकत्र येऊन मंगळवेढा नगर परिषदेसमोर जिल्हा उपाध्यक्ष सिद्राया माळी व तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू केले आहे
मंगळवेढा शहरात गेली अनेक वर्ष शहरांमध्ये दिव्यांग भवन व्हावे यासाठी मंगळवेढा प्रहार संघटना प्रयत्नशील होती. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले व नगरपालिकेने त्यांना सि स नं 28 70 ही खुली जागा दिव्यांग भवन साठी असेल असा ठराव करून दिला. त्या ठिकाणी जिल्हा नियोजन समिती मधून आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दिव्यांगांना भरघोस निधीही दिला.मंगळवेढा नगरपालिकेने त्याचे टेंडर काढले ,टेंडरची वर्क ऑर्डर ही झाली, ज्या ठेकेदारांनी टेंडर घेतले तो ठेकेदार अद्यापही काम करण्यास तयार नाही. त्यामुळे त्यामुळे मंगळवेढा शहरातील दिव्यांग एकत्र येऊन मंगळवेढा नगर परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
एक वर्ष झाले दिव्यांग भवन मंजूर होऊनही काम सुरू होत नसेल तर त्या ठेकेदारावर कारवाई करावी, श्री संत दामाजी मंदिर ते धान्य गोडाऊन पर्यंत भुयारी गटारी झाली त्या गटारी मधील मुरूम ज्यांनी चोरून विकला त्याच्यावरती कारवाई करावी अशा मागण्या साठी घेऊन प्रहार संघटने मंगळवेढा नगरपरिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे.जोपर्यंत दिव्यांग भवनाचे काम सुरू होत नाही तोपर्यंत चालूच ठेवणार अशी ठाम भूमिका जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी यांनी घेतली आहे.जिल्हा उपाध्यक्ष सिद्राया माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूअसून यावेळी तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे ,शहराध्यक्ष अनिल गुंगे ,तालुका संपर्कप्रमुख शकील खाटीक, शहर उपाध्यक्ष युवराज टेकाळे, महिला शहराध्यक्ष सविता सुरवसे, महिला तालुकाध्यक्ष रुक्मिणी कोकरे ,अरुणा घाडगे ,वैशाली कोळी, शबाना मकानदार,अबेदा पठाण,सुरय्या शेख,मोनिका बागल,विजया हत्ताळी,शहाजी कांबळे, सोपान सपताळे,असिफ खाटीक, तालुका उपाध्यक्ष सर्जेराव पाराध्ये, विवेक कुंभार, सतीश जावळे , अनिल धोडमिसे, सुलेमान रोंगीकर,गणेश मस्के, आप्पा गोरे ,संभाजी गोसावी ,सुहास धुमाळ, पिंटू कोळेकर ,दरेप्पा कांबळे, सुरेश पाटील, ज्ञानेश्वर निकम ,रामचंद्र मेटकरी, महादेव येडसे, सिद्धू मोगले, अतुल जाधव,तानाजी पवार, शिवानंद तटपटे,केशव आसबे, संतोष यादव , अर्जुन गायगोपाळ,अंकुश सकट व अनेक दिव्यांग बंधू व भगिनी उपस्थित होत्या.

