Take a fresh look at your lifestyle.

आंधळगाव येथील बेपत्ता असलेला अल्पवयीन मुलगा अवतरला शाळेत

पोलिसांसह आईचे टेन्शन दूर

919

- Advertisement -

 

मंगळवेढा  प्रतिनिधी

आंधळगाव ता मंगळवेढा येथून दि 19रोजी राहत्या घरातुन विशाल सुरेश कोळी (वय 14 वर्षे 4 महिने) हा अल्पवयीन शाळकरी मुलगा दि 19पासून बेपत्ता झाला होता. अखेर तो सहाव्या दिवशी देगाव येथील शाळेत दि 24रोजी सकाळी साडेदहा वाजता दाखल झाला.त्याच्या या आगमनाची खबर आईला देताना आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.तो परत आल्याने त्याची आई व पोलिस देखील टेन्शन मुक्त झाले.

       याबाबत अधिक माहिती अशी की
आंधळगाव ता मंगळवेढा येथून दि 19रोजी राहत्या घरातुन विशाल सुरेश कोळी (वय 14 वर्षे 4 महिने) हा अल्पवयीन शाळकरी मुलगा अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन फुस लावुन पळवून नेल्याची तक्रार मुलाची आई आव्वाबाई सुरेश कोळी वय 47 वर्षे हिने मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली होती.परंतु मिळालेली अधिक माहिती अशी की देगाव येथील शाळेत असलेला विशाल यास दि 19रोजी त्याची आई शाळेला जात नाही म्हणून रागवली होती व ती कामाला निघून गेली.त्यानंतर तो शाळेला जातो म्हणून गेला व शाळेत पोचला नाही त्याच्या आईने सगळीकडे शोध घेतला परंतु तो सापडला नाही.इकडे विशाल मात्र सांगली येथे गेला.त्यानंतर जवळ पैसे नसल्याने त्याने पोटासाठी चार दिवस काम केले. आईला फोन करण्यासाठी त्यास कोणी फोन दिला नाही. त्यामूळे चार दिवस काम करून आलेल्या पैशातून तो आज दिनांक 24रोजी घरी न येता तो शाळेत पोचला त्यानंतर तेथील शिक्षकानी विशालच्या  आईला फोन करून विशाल आल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचा मामा विजय मरीआईवाले हे विशाल ला भेटण्यास देगाव ला गेले व त्यास साडेतीन वाजता मंगळवेढा येथे घेवून आले असून ती सुख रूप असल्याची माहिती त्यानी आमच्या प्रतिनिधीशी दिली. तसेच त्यांनी एस टी प्रवास करताना आपल्याला झोप लागल्याने आपण सांगलीला पोहचलो तसेच पैसे नसल्याने मला लगेच येता आले नाही त्यामुळे काम करून पैसे मिळवले व आपण शाळेत आल्याचे विशाल ने सांगितल्याचे त्याच्या मामाने सांगितले.गेल्या पाच दिवसांपासून तो बेपत्ता असल्याने त्याची आई व पोलीस मात्र तणावात होते त्याच्या येण्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

 

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More