दिपावली साठी दामाजी कडून आणखी 51 रू उसबिलाचा हफ्ता, कर्मचाऱ्यांना 10 दिवसाचा पगार बोनस -चेअरमन शिवानंद पाटील
दामाजीकडून 2351रुपये होणार, एफ आर पी पेक्षा 54रू जादा दर
मंगळवेढा प्रतिनिधी
दामाजी कारखान्याची मागील हंगामाची एफआरपी 2296असताना कारखान्याने 2300प्रमाणे शेतकऱ्यांना सर्व बिल दिले होते.परंतु सद्या स्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या हेतूने येणाऱ्या दिपावली सणासाठी शेतकरयाना प्रति टन 51 आणखी जास्तीचे बिल दि 5नोव्हेंबर पासून शेतक-यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दामाजी कडून 2351 दर दिला जाणार असून कर्मचाऱ्यांना 10टक्के बोनस दिला जाणार असल्याची माहिती चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.
संत दामाजी साखर कारखान्याचा 31 वा गळीत हंगाम शुभारंभ24 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन अड. नंदकुमार पवार, माजी व्हा चेअरमन रामचंद्र वाकडे, संस्थापक संचालक सर्वश्री मनोहर कलुबर्मे, भुजंगराव पाटील, प्रकाश गायकवाड, दिलीप मर्दा, आबासोा बेदरे, संस्थापक संचालिका मंगल दुधाळ, मंदाकिनी बिराजदार यांचे शुभहस्ते पार पडला. संचालक राजेंद्र चरणुकाका पाटील व त्यांच्या पत्नी मंजुषा पाटील यांचे शुभ हस्ते श्री सत्यनारायण महापुजा करण्यात आली.
यावेळी पाटील पुढे म्हणाले की दामाजीची आर्थिक घडी विस्कटली असताना कारभार पारदर्शी व काटकसरीने करून शेतकरी, कामगार, ठेकेदार,यांची जुनी व चालू देणी भागवली आहेत. गेल्या गळीत हंगामातील सर्व देणी दिली असून एफ आर पी पेक्षा जादा दर दिला असून आता दिवाळीला 51 रुपये जादा दिले जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना एफ आर पी पेक्षा 54 रुपये जादा दिले असून येणाऱ्या गळीत हंगामामध्येही इतर कारखान्याच्या बरोबरीने चांगला ऊस दर देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.आहे.तसेच कामगारांचे पगारही महिन्याच्या दहा ताररखेच्या केले जात असून कामगारांच्या योगदानामुळे या दिपावलीसाठी कामगारांना दहा दिवसाच्या पगाराएवढा बोनस देणार असल्याचे सांगितले.चालू गळीत हंगामामध्ये कारखान्याने 4 लाख मे.टन गाळपाचे उद्षि्ट ठेवलेले आहे. सभासद शेतक-यांनी आपला ऊस दामाजी कारखान्यास गळीतास देवून सहकार्य करावे असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
पुढे बोलताना प्रा.शिवाजीराव काळुंगे म्हणाले, कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.मारवाडी वकील साहेबांनी अत्यंत काटकसरीने कारखाना चालविल्याने शेतक-याचे हे मंदिर सुरक्षित आहे. दामाजी कारखान्याचा ऊस वजन काटा अचुक असल्याने शेतक-यांचा या कारखान्यावर विश्वास आहे। या संचालक मंडळाने अत्यंत काटकसरीने हा कारखाना चालविला आहे. धनश्रीच्या माध्यमातून या कारखान्यास मदत करणार आहे. मागील हंगामातील ऊसाचा दर गेल्यावर्षीच्या एफआरपी पेक्षा जास्त दिल्याने शेतकऱ्यांनी दामाजीला ऊस घालण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी मनोहर कलुबर्मे,अड नंदकुमार पवार,लतिफ तांबोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्तविक कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी केले. याप्रसंगी व्हाईस चेअरमन तानाजीभाऊ खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर यांचेसह अजित जगताप, माजी भारत पाटील, बळवंतराव पाटील, जालिंदर व्हनुटगी शिवाजीराव नागणे, काशिनाथ पाटील, दत्ता कांबळे, प्रविण खवतोडे, रामा घोडके, इराण्णा पुजारी, नितीन पाटील, रामेश्वर मासाळ, काशिनाथ पाटील-, संतोष सोनगे, दत्ता भाकरे एकनाथ फटे, आदी उपस्थित होते आभार संचालक गोपाळ भगरे तर सुत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी केले.

