Take a fresh look at your lifestyle.

फटेवाडी,भालेवाडी सह पाच गावात राजकीय नेते व पुढाऱ्यांना गाव बंदी विशेष ग्रामसभेत केला ठराव

417

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी येथील ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेवून मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आरक्षण मिळेपर्यंत गावात राजकीय नेते व पुढाऱ्यांना गाव बंदी केली आहे सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा प्रकाश काळुंगे होत्या.

         सद्या राज्यात मराठा आरक्षणावरून रान पेटले आहे अनेक ठिकाणी रस्ता रोको, उपोषण सुरू असून वेगवेगळ्या माध्यमातून मराठा समाज आंदोलनात सक्रिय होत तीव्रता वाढवली आहे.मंगळवेढा तालुक्यात देखील मराठा समाजाच्या वतीने सक्रिय सहभाग नोंदवत साखळी आंदोलन सुरू आहे. तसेच ग्रामपंचायत फटेवाडी, भालेवाडी, माचनुर, लेंडवे चिंचाळे, रहाटेवाडी येथील ग्राम पंचायतीने विशेष ग्रामसभा घेवून मराठा समाजास (OBC) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षाचे राजकीय नेते व पुढारी यांना गावात येण्यास बंदी करन्याचा ठराव संमत करण्यात आला असून तसेच येणाऱ्या सर्व निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More