Take a fresh look at your lifestyle.

चालू गळीत हंगामात ४ लाख मे टनाचे उदिष्ट,इतरापेक्षा चांगला दर देण्यास कटिबध्द – शिवानंद पाटील

दामाजी कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न

503

- Advertisement -

मंगळवेढा  प्रतिनिधी
चालू गळीत हंगाम हा आव्हानात्मक असून या गळीत हंगामामध्ये 4 लाख मे टनाचे उदिष्ट ठेवले आहे. इतर कारखान्यापेक्षा चांगला दर देण्यास हे संचालक मंडळ कटिबध्द् आहे.असून गेल्या हंगामातील शेतकरी, कामगारासह सर्व देणी दिली असून शेतकऱ्यांनी आपला ऊस दामाजी कारखान्याचे गळीतासाठी पाठवुन कारखान्याचे प्रगतीसाठी सहकार्य करावे असे आवाहन शिवानंद पाटील यांनी केले
           संत दामाजी साखर कारखान्याच्या सन 23-24 सालच्या 31व्या बायलर अग्निप्रदिपन समारंभ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.प्रारंभी संचालक गौरीशंकर बुरकूल व सुविद्य पत्नी शितल बुरकूल या उभयतांचे शुभहस्ते श्री सत्यनारायण पुजा व होमहवन करण्यात आले.

         या प्रसंगी प्रमुख पाहुणे ह भ प जयवंत बोधले महाराज म्हणाले कि, दामाजी कारखान्याला व मंगळवेढा तालुक्याला अध्यात्माचा स्पर्श झालेला आहे. चोखोबा सारखे संत या मंगळवेढा भूमीत जन्मले व जगले म्हणूनच मंगळवेढा हे गांव सर्वश्रेष्ठ आहे.या संचालक मंडळाचा कारभार चांगला असून सभासद व कामगार यांच्या मदतीने येणारा गळीत हंगाम यशस्वी करतील असे त्यांनी संगितले. चेअरमन शिवानंद म्हणाले पाटील तालुक्यातील जेष्ठ मंडळी व माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगिरथ भालके यांच्या सहकार्याने आम्ही काम असल्याने कारखाना चांगला चालवू शकलो. गेल्या गळीत हंगामामध्ये एफआरपी पेक्षा जादा दर शेतक-यांना दिलेला आहे. मागील हंगामाचे ऊस बिल, तोडणी वाहतूक बिल, पूर्णपणे अदा केलेले आहे. कामगारांना दर महिन्याला वेळेवर पगार करीत आहोत. यावर्षीचा ऊसाचा दर देण्यात शेजारील कारखान्यापेक्षा कमी रहाणार नाही असे सांगितले.
           कार्यक्रमाचे अध्यक्षपदावरुन बोलताना धनश्री परिवाराचे मार्गदर्शक प्रा.शिवाजीराव काळुंगे म्हणाले, यावर्षी पाऊस कमी झाल्याने ऊसाचा उतारा व टनेज कमी रहणार आहे. या गळीत हंगामामध्ये कारखान्यांमध्ये ऊसाच्या बाबतीत स्पर्धा रहाणार आहे. शेतक-यांनीही नविन जातीचे व जास्त उतारा असणा-या ऊसाची लागण करणे गरजेचे आहे.गत हंगामात एफआरपी पेक्षा जादा दर या कारखान्याने शेतक-यांना दिलेला आहे.कामगारानाही हा गळीत हंगाम आव्हानात्मक असणार आहे हे लक्षात ठेवून काम करावे लागणार आहे असे ते म्हणाले.
        या वेळी माजी चेअरमन अड.नंदकुमार पवार
रामकृष्ण नागणे, रामचंद्र वाकडे, माजी संचालक यादाप्पा माळी , कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजीभाऊ खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणु पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळकर,कार्यकारी संचालक रमेश जायभाय जालिंदर व्हनुटगी, भारत पाटील, कल्याण रोकडे, रामलिंग कवचाळे, काशिनाथ पाटील, इराण्णा पुजारी, रावसाहेब लिगाडे, दौलत माने, दादा पवार, संतोष मोगले, अशोक माळी, विजय बुरकूल, माणिक पवार, गुलाब थोरबोले, बंडू करे, शिवाजी घोडके, हणमंत रोकडे, तानाजी रोकडे, अशोक पवार, खुतबुद्दीन शेख, सुनिल जाधव, भागवत भुसे, प्रकाश पाटील, दत्ता गडदे, संपत गडदे,आदी उपस्थित होते.आभार संचालक दिगंबर भाकरे यांनी मानले तर सुत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी केले.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More