Take a fresh look at your lifestyle.

आश्वासन देवूनही वेळेवर काम न केल्यामुळे न पा बांधकाम अधिकाऱ्याचा गांधीगिरी पद्धतीने सत्कार

660

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

मंगळवेढा शहरातील शहरातील गतिरोधक व जड वाहतूक बंदी संदर्भातील फलक चार दिवसात बसवण्याचे लेखी आश्वासन न पा प्रशासनाने नागरिकांना दिले होते परंतु पंधरा दिवस उलटले तरी कोणतीही कारवाई केली नसल्याने मंगळवेढा नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे प्रमुख प्रशांत सोनटक्के यांचा शाल,फेटा श्रीफळ देऊन वेळेवर काम न केल्याबद्दल गांधीगिरी पद्धतीने सत्कार करण्यात आला.

             अनेक दिवसापासून मंगळवेढा शहरातील अवजड वाहतूक बंद करावी यासाठी नागरिकांनी मंगळवेढा नगरपालिकेकडे तोंडी व लेखी पत्र व्यवहार केला होता परंतु नगरपालिकेने याबाबत कोणतीही कारवाई केली नाही.त्यांच्या दुर्लक्ष्यतेमुळे आजपर्यंत19जणांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत. काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आलेले आहे यापुढे देखील मंगळवेढातील नागरिकांच्या जीविताला धोका आहे.नगरपालिकेने गतिरोधक व अवजड वाहतूक बंदीचे फलक लावावे यासाठी नागरिकांनी अनेक आंदोलने देखील केली आहेत. परंतु वेळोवेळी केवळ आश्वासने देवून कामास टाळाटाळ केली आहे .गेल्या 15दिवसापूर्वी येथील अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता त्यावेळी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं त्यावेळी नगरपालिका प्रशासनाने चार दिवसात गतिरोधक व अवजड वाहतूक बंदीचे फलक लावण्याचे आश्वासन दिले होते परंतु पंधरा दिवस उलटून गेले तरी काहीच कार्यवाही न केल्याने येथील बांधकाम विभाग प्रमुख प्रशांत सोनटक्के यांचा शाल,फेटा श्रीफळ देऊन वेळेवर काम न केल्याबद्दल गांधीगिरी पद्धतीने सत्कार करण्यात आला.

       यावेळी मारुती वाकडे,सुहास पवार,सतीश दत्तू,नागेश डोंगरे,सिद्धेश्वर डोंगरे,सुरेश पाटील,आदित्य हिंदुस्तानी,अजय अदाटे,चंद्रकांत जाधव,दिग्विजय वाकडे उपस्थित होते.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More