Take a fresh look at your lifestyle.

चरण कोल्हे यांची मंगळवेढा नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती

476

- Advertisement -

 

मंगळवेढा  प्रतिनिधी

गेल्या तीन महिन्यापासून रिक्त असलेल्या मंगळवेढा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिके चे सहाय्यक आयुक्त असलेले चरण कोल्हे यांची नियुक्ती झाली आहे.

            मंगळवेढा ही संतांची भूमी असून येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी असलेले निशिकांत प्रचंड राव यांची शिराळा नगरपालिकेत बदली झाल्याने हे पद गेल्या तीन महिन्यापासून रिक्त होते. मंगळवेढा नगरपालिकेचा पदभार मोहोळ येथील मुख्याधिकारी योगेश डोके यांच्याकडे होता. सद्या नगरपालिकेवर प्रशासक असल्यामुळे व मुख्याधिकारी रिक्त असल्यामुळे शहर विकासाची कामे प्रलंबित राहिली आहेत.नव्याने रुजू झालेले प्रांताधिकारी बी आर माळी यांनी प्रशासक पदाचा पदभार घेतल्यानंतर तेथील यंत्रणा हलवली होती. परंतु मुख्याधिकारी नसल्यामुळे निधी मंजूर असून देखील शहरातील विकास कामे रखडली होती. तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मंगळवेढा नगरपालिकेला अखेर पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाला आहे . दिनांक 18ऑक्टोंबर रोजी चरण कोल्हे हे मंगळवेढा नगरपालिकेचा पदभार हाती घेण्याची शक्यता आहे. नगर विकास खात्याचे आवरसचिव अ. का. लक्कास यांच्या सहीने प्रशासकीय कारणास्तव बदली झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

          दि 17ऑक्टोबर रोजी सांगली मिरज कुपवाड येथील या पदावरून कोल्हे यांना कार्यमुक्त करण्यात येत असून दिनांक 18 पासून बदलीच्या ठिकाणी रुजू होऊन शासनाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. चरण कोल्हे यांच्या नियुक्तीमुळे शहर विकासाची कामे मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More