Take a fresh look at your lifestyle.

चालू गळीत हंगामात ऊसदराच्या बाबतीत युटोपियन शुगर खाजगी कारखान्यापेक्षा अग्रेसर असेल –उमेश परिचारक

255

- Advertisement -

 

 

मंगळवेढा प्रतिनिधी:-

चालू गळीत हंगामामधे युटोपियन कडून अपेक्षित ऊस गाळपाचे नियोजन करण्यात आले असून ऊसउत्पादकाना खाजगी कारखान्याच्या तुलनेत ऊस दराबाबतीत युटोपियन अग्रेसर राहणार आसल्याचे कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी सांगितले .

           कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या 23-24 या दहाव्या गळीत हंगामाचे बॉयलर पूजन व अग्निप्रदीपन समारंभ मंगळवार दि.17 रोजी आयोजित करण्यात आले होते. कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते बॉयलरपूजन व अग्निप्रदीपन करण्यात आले.प्रारंभी कारखान्याचे संगणक विभाग प्रमुख अभिजीत यादव व त्यांच्या सुविद्य पत्नी जयश्री यांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा करण्यात आली.

              यावेळी बोलताना चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की, गळीत हंगाम 23-24 हा कारखान्याचा दशकपूर्ती गळीत हंगाम आहे. मागील ९ वर्षात केवळ ऊस उत्पादक व कर्मचारी यांच्या विश्वासावर कारखान्याने नावलौकिक चांगला मिळवलेला आहे. ही विश्वासाहर्ता कायम ठेवण्यासाठी युटोपियन हा कायम बांधील राहील असा विश्वास ही परिचारक यानी व्यक्त केला.

             सध्या दुष्काळ सदृश्य स्थिती असतानाही कारखाना चालू गळीत हंगाम 23-24 पुढील ही गळीत हंगाम24-25हा सुद्धा केवळ ऊस उत्पादक यांच्या विश्वासावर, व ऊस उत्पादक यांना वेळेत व चांगला दर देत असल्यामुळे यशस्वी पार पाडेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.  मागील गळीत हंगाम 22-23 मध्ये कारखान्याने १ कोटी ४४ लाख लिटर चे इथेनोल उत्पादन केले असून तितकेच उत्पादन याही वर्षी अपेक्षित आहे. गळीत हंगाम23-24 करीता आपली सर्व यंत्रणा सज्ज आहे. सर्व कामगार वर्गांनी शक्य तितके काटकसरीचे धोरण अवलंबून गळीत हंगाम यशस्वी करावा त्यातच आपणा सर्वांचे हित असल्याचे ही त्यांनी सांगितले.

      सदर प्रसंगी प्रगतशील बागायतदार नागनाथ मोहिते यांचे सह कारखान्याचे सर्व खातेप्रमुख , अधिकारी, व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. यावेळी स्वागत,प्रास्ताविक व आभार लक्ष्मण पांढरे यांनी केले.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More