Take a fresh look at your lifestyle.

संत चोखामेळा साहित्य संमेलनाच्या भित्ती पत्रिकेचे संमेलनाध्यक्ष डॉ आप्पासाहेब पुजारी यांच्या हस्ते अनावरण

219

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

संत चोखामेळा अध्यासन केंद्र पुणे यांच्या विद्यमाने दि १८ व १९ नोव्हेंबर २० दि २३ रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पुण्यक्षेत्र आळंदी येथे चोखामेळा संत साहित्य पहिले संपन्न होत आहे. या संमेलनाच्या भित्ती पत्रकाचे अनावरण संमेलनाध्यक्ष डॉ. आप्पासाहेब पुजारी यांच्या हस्ते आंधळगाव येथे दि.१६ आक्टोंबर २०२३ रोजी जामनेर, जि. जळगाव येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण सुखदेवराव इंगळे यांच्या उपस्थितीत पार पडले.

      यावेळी बोलताना डॉ पुजारी म्हणाले, चोखोबा व त्यांचे कुटुंबीय यांचे साहित्य आजच्या काळात समतेचे विचार प्रफुल्लित करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका निभावत आहे. म्हणून किर्तनातून, प्रवचनातून पुस्तक रूपातून या कुटुंबयांच्या काव्याचे आणखी प्रभावीपणे समाजासमोर मांडणी व्हायला पाहिजे. त्यातीलच एक भाग म्हणजे श्री सचिन पाटील यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेले हे संमेलन होय. नामदेवरायांच्या पुढाकाराने चोखोबांनी मराठी साहित्य सारस्वताला दिलेली देणगी ही अनमोल स्वरूपाची आहे.

      या प्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. आप्पासाहेब पुजारी, जामनेर पंचायत समितीचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण सुखदेवराव इंगळे,अधिकारी बन्सीलाल चव्हाण, गजानन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव नागणे, माजी पोष्टमास्तर श्रीकांत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. पार्थ घारगे यांनी आभार मानले.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More