Take a fresh look at your lifestyle.

वाचनामुळे आयुष्यात सर्वांगीण विकासाला चालना मिळते- विजय खवतोडे

199

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

वाचनामुळे माणसाच्या सर्वांगीण विकासाला , विचाराला चालना मिळते. थोर व्यक्ती ह्या प्रसंगी उपाशी राहिल्या पण आपल्या वाचनाची भूक त्यानी भागवली. त्यामुळे प्रत्येकाने दिसामाजी काहीतरी वाचत जावे तरच आपल्या आयुष्यात बदल होवू शकेल असे विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी नगरसेवक विजय खवतोडे व्यक्त केले. 

           डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय मंगळवेढा येथे दि.15 ऑक्टोबर हा दिवस भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस हा ‘वाचक प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

   यावेळी कु.राजरतन खवतोडे याने गीत गायन केले.प्रा. दत्ता सरगर यांनी ए. पी. जे. अब्दुल कलाम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी परिस्थितीवर मात करीत शिक्षण घेवून उच्च पदावर पोचल्याचे सांगून त्यांच्या जीवनात पुस्तकामुळे क्रांती झाली त्यांचे विचार जगाने आत्मसात केले असल्याचे सांगितले.

        या कार्यक्रमावेळी माजी नगरसेवक अजित जगताप, फिरोज मुलाणी, अरूण किल्लेदार, मकसूद बागवान,अण्णासाहेब राऊत, सावळे सर,प्रा. दत्ता सरगर. बाबूल मुजावर,सुरेश मरिआईवाले, सागर खरबडे, सौरभ देसाई, प्रदीप खवतोडे, बालाजी मस्के, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. 

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More