मंगळवेढा प्रतिनिधी
फटेवाडी ग्रामपंचायत व आरोग्यवर्धिनी केंद्र डोणज यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा फटेवाडी येथे मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले
या शिबिराचे उद्घाटन सरपंच सीमा काळूंगे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कुष्ठरोग, क्षयरोग, असंसर्गजन्य व्याधी, डेंग्यू आदी आजारांविषयी उपस्थित महिलांना माहिती देण्यात आली. याप्रसंगी उपस्थित फटेवाडीच्या सरपंच सीमा काळुंगे म्हणाल्या,महिलांनी संसाराच्या बरोबरीने स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. ज्या घरातील महिला सदृढ असतील तेथील घर देखील आरोग्यमय असते. आरोग्याच्या बाबतीत नेहमीच सतर्क राहिले पाहिजे.कोणताही आजार अंगावर न काढता वेळीच उपचार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ गौरीशंकर बुगडे,प्रमोद म्हमाणे, अंगणवाडी सेविका हिरेमठ मदतनीस, आशावर्कर विद्या मेटकरी,आरोग्य कर्मचारी व महिला उपस्थित होत्या.

