Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हून्नुर येथे टेंभू, म्हैसाळ योजनेतील उर्वरित गाव पाणीवितरण बाबत चर्चासत्र व शेतकरी संवाद

मंगळवेढा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अभिजित पाटील यांची माहिती

206

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पंढरपूर मंगळवेढा दौऱ्यावर दिनांक 6ऑक्टोबर 2023 रोजी येणार असून मंगळवेढा शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सकाळी 11वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील टेंभू-म्हैसाळ योजनेतील उर्वरित गावांचा पाणी वितरण प्रश्न बाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हुन्नूर ता.मंगळवेढा येथे शेतकरी संवाद व पाणी वितरण बाबत सविस्तर चर्चा सत्र होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी दिली.

         कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, तसेच राष्ट्रवादीचे शेखर माने, मंगळवेढा राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राहुल शहा, सहसचिव प्रदेश विजयकुमार खवतोडे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अध्यक्ष ॲड.दत्तात्रय पाटील, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा कार्याध्यक्ष मुजम्मील काझी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, महिला तालुकाध्यक्ष संगीताताई कट्टे-पाटील, माणिक गुंगे यासह असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. राज्यातील सत्ता बदलानंतर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पहिल्यांदाच मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून टेंभू व म्हैसाळ पाण्याच्या वाटपाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More