Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची तोफ 5 ऑक्टोंबर रोजी मंगळवेढयात धडाडणार

253

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

        मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळावे, ही मनोज जरांगे-पाटील यांच्यासह असंख्य समाज बांधवांची मागणी आहे. या मागणीसाठीच त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण केले.१४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठी जाहीर सभा होणार आहे.या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील राज्यभर दौरा करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांची गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता आठवडा बाजार शिवप्रेमी चौक मंगळवेढा येथे जाहीर सभा होणार आहे.

           मराठा आरक्षण प्रश्र्नी मंगळवेढा तालुक्यामध्ये मराठा समाजाने विविध प्रकारे आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले व आंदोलनाची धग कायम ठेवली असल्याने सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा येथे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सभा घेण्याचे निश्चित केले ही सभा सायंकाळी शिवप्रेमी चौकातील आठवडा बाजार पटांगणात होणार असून या सभेपूर्वी शाहीर राजेंद्र कांबळे यांचा पोवाडा सादर केला जाणार आहे.तसेच ज्या समाज बांधवांकडे काही जुन्या नोंदी असतील, जुने दाखले असतील अथवा ही भूमिका बळकट करण्यासाठी काही पुरावे असतील तर त्यांनी घेऊन यावेत. हे पुरावे जरांगे-पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात येतील असे आवाहन मंगळवेढा तालुका सकल मराठा समाज वतीने करण्यात येत आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More