Take a fresh look at your lifestyle.

शेती विकण्यासाठी 75 वर्षीय वृध्द वडिलास मुलाकडून बेदम मारहाण

पडोळकर वाडी येथील घटना, मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

644

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

पडोळकर वाडी ता. मंगळवेढा येथील एका ७५ वर्षीय वृद्ध वडिलास शेती विकून पैसे द्या असे म्हणत मुलाने काठीने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच तुम्हाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी आरोपी तथा मुलगा बिराप्पा दगडू पडोळकर (रा. पडोळकरवाडी) याच्या विरोधात मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

            याबाबत अधिक माहिती अशी की दि.17रोजी सायं.7 वाजता यातील फिर्यादी तथा जखमी दगडू कृष्णा पडोळकर (वय ७५) हे पडोळकरवाडी येथील राहते घरामध्ये चहा पिवून बसले होते. दरम्यान आरोपी तथा मुलगा बिराप्पा पडोळकर हा दारु पिवून घरी आला व त्याने शेती विकून मला पैसे देणार आहे की नाही असे म्हणून शिवीगाळी दमदाटी करु लागला. त्यावेळी फिर्यादीने मी शेती विकणार नाही असे म्हणताच आरोपी फिर्यादीच्या अंगावर धावून गेला व लाकडी काठीने डावे हातावर मारुन गंभीर जखमी केले. यावेळी फिर्यादीने आरडाओरड केल्यावर शेजारी राहणारे विष्णू मोटे यांनी भांडणे सोडवासोडवी केली. आरोपीने फिर्यादीस तू शेती कसा विकत नाही, तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देवून निघून गेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत

.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More