मंगळवेढ्यात मराठा आरक्षण प्रश्नी ‘सरकारचा घातला तिसरा’ कावळ्याने ही घास शिवला
चक्का जाम आंदोलनामुळे महामार्ग एक तास ठप्प
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढ्यात मराठा आरक्षणप्रश्नी सुरू असलेल्या आंदोलनात रविवार दिनांक 17रोजी सोलापूर मंगळवेढा रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करत सरकारचा निषेध केला.तसेच या वेळी संत दामाजी चौकात असलेल्या मंडपासमोर केलेल्या सरकारच्या प्रतिकात्मक दहन विधीचा ‘तिसरा दिवस’ करण्यात आला. यावेळी चक्क कावळ्याने घास शिवला.
गेल्या 12सप्टेंबर पासून सुरू असलेल्या आंदोलनाला विविध संघटनानी पाठिंबा पत्र दिले आले. आज यामध्ये मेडिकल असोसिएशन व कोळी समाजाने मराठा आरक्षण मागणीला पाठिंबा दिला. सकाळी 11 वाजता मंगळवेढा सोलापूर रस्त्यावरील जुन्या टोल नाक्याजवळ सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी चक्काजाम आंदोलन केले. यावेळी महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती.
याप्रसंगी येताळा भगत यांनी सरकारकडून आरक्षण देण्याची मानसिकता दिसत नसून केंद्रात व राज्यात एकाच विचाराचे सरकार असून देखील अद्याप आरक्षण प्रश्न तोडगा काढला जात नाही यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सरकार करत असून यापेक्षा तीव्र आंदोलन राज्यभर उभे करावे लागणार आहे. सरकारने मागून घेतलेल्या मुदतीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर चाल ढकल न करता महिन्याभरात तोडगा काढावा अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा दिला. यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंडूभैरी यांनी मराठा आरक्षण प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे आरक्षण देण्याची मानसिकता दिसत नसल्यामुळे संघर्ष अटळ आहे असे सांगितले.
यावेळी सतीश दत्तू,राहुल सावजी,नारायण गोवे, संभाजी घुले,शिवाजी वाकडे, विठ्ठल गायकवाड,आनंद मुढे, प्रकाश मुळीक,सुखदेव डोरले,युवराज घुले,मारुती वाकडे,राहुल घुले,अनिल मुद्गुल,विजय हजारे,समाधान हेंबाडे,सुरेश कट्टे, बाळू नागणे, दत्तात्रय भोसले, स्वप्निल फुगारे,भगवान चव्हाण आदी उपस्थित होते.

