कामगारांसाठी असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा – सिद्धेश्वर आवताडे
संत दामाजी नगर मध्ये वैदू वस्ती येथे कामगारांसाठी मोफत भोजन योजनेचा शुभारंभ
मंगळवेढा प्रतिनिधी
राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने सर्व क्षेत्रातील कामगारांसाठी सुरु असलेल्या महाराष्ट्र शासन कामगार कल्याण विभागाच्या योजनेचा लाभ कामगारांनी घेण्याचे आवाहन खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी केले
महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मोफत भोजन व्यवस्था या योजने अंतर्गत श्री संत दामाजी नगर ग्रामपंचायत वैद्यू वस्ती येथे मोफत भोजन वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी श्री संत दामाजी ग्रा.पं.सरपंच जमिर(भाई)सुतार,उपसरपंच संजय जगताप,सदस्य आण्णा आसबे,सदस्य बसुकाका माळी,सदस्य संजय माळी,पाणीपुरवठा व स्वच्छता अध्यक्ष दिलिप उगाडे,प्रकाश बाबर,दासू शिंदे,गोविंद वरगंटी, अंकांना मेळकुंदी, स्वामी गुडील, सुनील गुडील,सौ.लक्ष्मी मेळकुंदी, बबी मेळकुंदी.लक्ष्मी वरगंटी निखिल मेळकुंदी,दुर्गाप्पा मेळकुंदी, आदी उपस्थित होते.

