Take a fresh look at your lifestyle.

संत भूमीत भारतीय संस्कृती जपणारी शिक्षण प्रसारक मंडळ ही आदर्श संस्था – सिनेअभिनेते विजय गोखले

दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेजचा ४० वा वर्धापनदिन ऊत्साहात संपन्न 

228

- Advertisement -

 

 

मंगळवेढा प्रतिनिधी

हल्ली जुन्या गोष्टी संपुष्टात येऊन पाश्चात्य गोष्टींचे अनुकरण होत आहे परंतु मंगळवेढा येथील संतांच्या पवित्र भूमीत शिक्षण प्रसारक मंडळ,मंगळवेढा संचलित दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेजने भारतीय संस्कृती जतन केल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने ही शिक्षण संस्था आदर्श विद्यार्थी घडवणारी संस्था असल्याचे मत मराठी सिनेअभिनेते विजय गोखले यांनी व्यक्त केले.

   कार्यक्रमाच्या प्रारंभी दलित मित्र स्व.कदम गुरुजी यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

               दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेजच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेली शिक्षण प्रसारक मंडळ संचालिका तथा अॅडमिनीस्टेटर डॉ मिनाक्षी कदम, उपाध्यक्ष डॉ सुभाष कदम, सचिवा प्रियदर्शनी महाडिक, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सदस्या तथा संचालिका प्रा. तेजस्विनी कदम, आकाशवाणी वृत्तनिवेदिका मंजुषा गाडगीळ, महाराष्ट्र शासन रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण सदस्य गुरु वठारे ,संचालक अॅड शिवाजी पाटील,यतिराज वाकळे ,प्राचार्य रविंद्र काशीद ,डॉ.नाईक,सुरेश आवताडे, गोपाळ क्षीरसागर, भाऊसाहेब पाटिल आदीजण उपस्थित होते. 

            पुढे विजय गोखले म्हणाले,विद्यार्थी शिक्षण घेऊन समाजाचे प्रतिनिधित्व करत असताना संस्काराचे गाठोडे घेवून पुढे जातो. शिक्षणामुळे समाज प्रगतिपथावर जातो. कदम परिवार दमदार असून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याकडे त्यांचा कल असतो. शिक्षणाबरोबर विविध कलाकौशल्याद्वारे शिक्षण दिले जाते. प्रोत्साहनाच्या पाठिंब्यावर पराक्रमाचे गड जिंकले जातात. उत्तेजन प्रोत्साहन याहून स्वस्त काहीच नाही, जगात कुठेही जा याहून मस्त काहीच नाही असे सांगत विविध 

काव्यपंक्तीतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

          डॉ मिनाक्षी कदम म्हणाल्या,बहुजन समाज शिकला पहिजे तरच उज्वल देशाचे नागरिक घडतील. त्यागाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. कदम गुरुजी यांनी शिक्षणाची गंगा गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली विद्यार्थी घडवण्यासाठी स्वतःची शेती विकून शिक्षण देण्याचे काम केले. आज एका रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर झालेले आहे. डॉ सुभाष कदम यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण तालुक्यातच घेता यावे. यासाठी दलित मित्र कदम गुरुजी गुरुजी सायन्स कॉलेजची स्थापना केली. आज संस्थेचे अध्यक्ष ऍड सुजित कदम यांनी संस्थेचा विकास करत डी व बी फार्मसी कॉलेज सुरू केले. यापुढेही शैक्षणिक कार्य सुरूच राहणार आहे.

       प्रियदर्शनी महाडिक म्हणाल्या,नुकतेच आपल्या देशातील इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान ३ चंद्रावर पाठवले यामध्ये आमच्या प्रशालेला विद्यार्थी आनंद जोशी यांनीही काम केले आहे.अशा विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान वाटतो.शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना १९६० साली झाली.संस्थेचे उद्घाटन तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते.तेव्हा त्यांनी सांगितले होते की,संत दामाजी पतांनी धान्याची कोठारे खुली करुन दुष्काळात गरीबांची भुक भागवली होती. तशीच शिक्षणाचे कोठार उघडून गुरुजींनी गोरगरीबांच्या शिक्षणाची सोय केली आहे.त्यांनी दिलेली शिकवण आज आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून पुढच्या पिढीला देण्याचे काम करत आहोत. 

              यावेळी सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांचा आदर्श शाळा पुरस्कार भोसे प्रशालेला मिळाल्याबद्दल प्राचार्य जयराम आलदर यांचा सिनेअभिनेते विजय गोखले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

     यावेळी प्राचार्य जयराम आलदर, कल्याण भोसले,रमेश पवार ,मुख्याध्यापक अजित शिंदे, सुभाष बाबर, उपमुख्याध्यापक सुनिल नागणे, सुनिल खंदारे,पर्यवेक्षक राजू काझी ,दिलीप चंदनशिवे, सुहास माने तसेच प्राध्यापक- प्राध्यापिका, शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदीजण उपस्थित होते. कार्यक्रम सूत्रसंचालन बालाजी शिंदे व आश्पाक काझी यांनी केले तर आभार सुहास माने यांनी मानले. 

       दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेजच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले.सहशिक्षिका आलिया कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल पथक सादर करण्यात आले होते.सुंदर व सुबक रांगोळी सुजाता आडसुळ यांनी काढलेली होती. इंग्लिश स्कूल वेळापूरचे उपमुख्याध्यापक सुनिल खंदारे यांनी ५ फुटाची वावडी तयार करण्यात केली होती.इयत्ता ७ वी मध्ये शिकणार्‍या १२ विद्यार्थ्यांनी स्वतः ज्वारीची भाकरी चा प्रात्यक्षिक करून दाखवले. यासाठी वाल्मिक मासाळ,ए.एम लिबोळे, ज्योती पाटील, आलिया कादरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड नृत्य सादर केले. त्यामुळे कार्यक्रमात रंगत आली.तसेच ६ वळतील विद्यार्थी समर्थ नागणे या विद्यार्थ्यांसमवेत मनमुराद नृत्य केले. 

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More