Take a fresh look at your lifestyle.

आ.समाधान आवताडे यांच्या सूचनेवरून मंगळवेढा शहरातील अतिक्रमण मोहीम स्थगित, व्यापाऱ्यांना दिलासा

406

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने शहरातीलअतिक्रमण विरोधात मोहीम सुरू केली होती सध्याची दुष्काळी परिस्थिती व कोरोनांतर व्यवसायात आलेली मंदी पाहता व्यापाऱ्यांना आणखीन झळ बसू नये यासाठी ही अतिक्रमण मोहीम थांबवावी याबाबतच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासनाला दिल्यानंतर प्रशासनाने दिनांक 25 रोजी केली जाणारी अतिक्रमण विरोधातील मोहीम स्थगित केली आहे.
              मंगळवेढा शहरात वाढत्या अतिक्रमणाला रोखण्यासाठी व वाहतुकीला अडथळा होवू नये यासाठी मंगळवेढा नगरपरिषद व पोलिस प्रशासन यांच्या वतीने मंगळवेढा शहरातील सुमारे 326 अतिक्रमणे काढण्याचे नियोजन असून त्यातील वाहतुकीस जादा अडथळा ठरणारी 125अतिक्रमणे दिनांक 24रोजी काढण्यात आली आहेत. परंतु यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे नुकसान झाले आहे .सद्या मंगळवेढा शहरातील छोटे मोठे दुकानदार कोरोना महामारीनंतर व्यापार पेठ उध्वस्त झाली होती त्यातच लांबलेला पाऊस आणि आता येणारे राखी पौर्णिमा, श्रावण महिना, पोळा, गणेशोत्सव, नवरात्र महोत्सव व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे सण असताना हे मोहीम करण्याचे योजले होते परंतु या अतिक्रमण मोहीम संदर्भात आमदार समाधान दादा अवताडे तेलंगाना मध्ये असताना सुद्धा त्यांनी नगर पालिका प्रशासक उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांना मोहीम स्थगित करण्याचा सक्त सूचना देण्यात आल्या याची दखल घेऊन प्रशासनाने दिनांक 25 ऑगस्ट रोजी होऊ घातलेले अतिक्रमण मोहीम स्थगित केले आहे.

        परंतु एसटी स्टँड परिसर व इंग्लिश स्कूल परिसर या परिसरातील काही विक्रेत्यांनी या मोहिमेची धास्ती घेऊन स्वतःहून अतिक्रमणे काढली आहेत. परंतु काल रात्री उशीर पर्यंत झालेल्या मोहिमेबाबत संबंधित प्रशासन अधिकारी यांना आमदारानी अतिक्रमण मोहिम स्थगित करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार हे अतिक्रमण मोहीम स्थगित करण्यात आली आहे येणारे सणासुदीचे दिवस पाहता ही मोहीम स्थगित झाल्यामुळे छोटे व्यवसाय करणारे यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More