Take a fresh look at your lifestyle.

डबल पैसे देण्याचे आमिष दाखवून तरुणीने 5 लाख 70 हजाराला गंडविले

मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील तरुणी विरोधात गुन्हा दाखल

1,085

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी

लाल व काळ्या कंपनीत पैसे डबल करुन देतो अशी खोटी बतावणी करुन फोन पे च्या माध्यमातून 5 लाख 70 हजार घेवून बँक खात्यात पैसे नाहीत अशा बँकेचा चेक देवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी प्रियांका बाबू लोहार (रा.हुलजंती) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला असून अधिक चौकशीसाठी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

         या घटनेची हकीकत अशी, यातील फिर्यादी वैभव अनिल जमादार (वय 25) यांचे मेडिकल असून दि.1 जुलै 2022 ते 10 जून 2023 या दरम्यान हुलजंती येथील महिला आरोपी प्रियांका बाबू लोहार हिने सोलापूर येथील लाल व काळ्या कंपनीत पैसे डबल करुन देते अशी खोटी बतावणी करुन फिर्यादीकडून 1 लाख 80 हजार फोन पे च्या माध्यमातून तसेच फिर्यादीची पत्नीहेमा जमादार यांच्याकडून रोख 2 लाखरुपये फिर्यादीची आई सुनंदा यांच्याकडून1लाख 90 हजार रुपये असे एकूण 5लाख70 हजार रुपये घेतले.

      दिलेल्या रकमेच्या डबल रक्कम टाकून सही करुन जिल्हा मध्यवर्ती बँक सोलापूर येथील चेक सही करुन दिला. मात्र सदर बँकेत जावून चौकशी केली असता त्या अकाऊंटला शिल्लक रक्कम नसल्याचे समजले. वैभव जमादार प्रमाणेच गावातील इतर लोकांचीही दिशाभूल करुन बँक खात्यामध्ये पैसे नाहीत अशा बँकेचा चेक देवून आर्थिक फसवणूक करुन गाव सोडून पळून गेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून याचा अधिक तपास प्रभारी पोलीस अधिकारी नयोमी साटम ह्या करीत आहेत.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More