Take a fresh look at your lifestyle.

मंगळवेढा ते घाटुळ वस्ती रस्ता डांबरीकरण करा:

युवराज घुले यांनी केली आ.समाधान आवताडे यांच्याकडे मागणी

312

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा ते घाटुळ वस्ती रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन डांबरीकरण करण्याची मागणी आ. समाधान आवताडे यांच्याकडे स्वाभिमानीचे युवराज घुले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

        आमदार समाधान आवताडे यांच्या संपर्क कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी या मागणीचे  निवेदन दिले. त्या निवेदनामध्ये म्हटले आहे, की मंगळवेढा ते घाटुळ वस्ती रस्ता हा शहरापासूनचा जवळचा भाग असून या भागामध्ये असंख्य लोकवस्ती झालेली आहे त्या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिकांची रहदारी आहे. परंतु तो रस्ता डांबरीकरण होऊन वीस वर्ष होऊन गेलेले आहेत तो रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे त्या भागात राहणाऱ्या लोक वस्तीस खराब रस्त्यामुळे मरण यातना भोगाव्या लागत असून कर्तव्यदक्ष आमदार म्हणून मंगळवेढा तालुक्यातील अनेक रस्त्यास आपण निधी उपलब्ध करून दिला आहे.त्यामुळे या रस्त्यासाठी सुद्धा शासन दरबारी पाठपुरावा करून तात्काळ डांबरीकरणाची मंजुरी मिळवून रस्ता डांबरीकरण करण्यासाठी प्रयत्न करावा व त्या भागातील रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.

       याप्रसंगी निवेदन देताना दामाजी शुगरचे माजी संचालक लक्ष्मण तात्या जगताप, निवृत्त शिक्षणाधिकारी ज्ञानदेव जावीर, बापूसाहेब कलुबर्मे, पप्पू नाना दत्तू, राहुल गवंड आदी शेतकरी उपस्थित होते

चौकट-
           मंगळवेढा पंढरपूर मतदार संघामध्ये रस्तेदुरुस्ती व नवीन रस्त्यांसाठी आ. समाधान आवताडे यांनी भरघोस निधी उपलब्ध केल्याने शेतकरी व नागरिक यांची गैरसोय दूर झाली आहे. नागणेवाडी ते घाटुळ वस्ती रस्त्यासाठी सुद्धा ते तात्काळ मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजुरी व निधी मिळवून रस्ता डांबरीकरण करतील अशी अपेक्षा आहे.
– युवराज घुले,
जिल्हा संघटक स्वाभिमानी

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More