’24 तासात वीज कनेक्शन’ मोहिमेअंतर्गत पंढरपूर शहरात दिले अवघ्या 2 तासात घरगुती वीज कनेक्शन
पंढरपूर महावितरण ची कामगिरी
पंढरपूर प्रतिनिधी
महावितरण कंपनीकडून घरगुती ग्राहकांना तत्काळ वीजजोडणी मिळावी यासाठी मुख्य अभियंता बारामती परिमंडल सुनील पावडे यांच्या आव्हानानुसार “24 तासात वीजकनेक्शन” या मोहिमेअंतर्गत वीज जोडणी देण्याची मोहीम पंढरपूर विभागात राबविण्यात येत आहे.
पंढरपूर शहर उपविभाग येथील उपविभागीय अधिकारी भिकाजी भोळे यांनी पंढरपूर शाखा कार्यालय नवी जुनी पेठ,शाखा अधिकारी अजय गावडे, सहाय्यक अभियंता केसकर मॅडम, प्रधान तंत्रज्ञ जोतिराम रणदिवे, वरिष्ठ तंत्रज्ञ एम.डी.जाधव,अकील मुजावर,वैभव शिंदे यांच्या सहकार्याने पंढरपूर शहरातील ग्राहक फैमेदा रशीद करमाळकर, गणपती मंदिर भोसले चौक पंढरपूर शहर यांना वीज जोड मागणीचा अर्ज दिल्यापासून अवघ्या 2 तासात घरगुती कनेक्शन देऊन वरील मोहिमेस सुरुवात केली.तसेच या योजनेअंतर्गत मागेल त्याला तातडीने वीजजोडणी देण्यात येईल असे उपविभागीय अधिकारी भिकाजी भोळे यांनी सांगितले. यासाठी प्र.अधीक्षक अभियंता संजय शिंदे, कार्यकारी अभियंता विजय पाटील यांचे सहकार्य लाभले.
घरगुती ग्राहकाना तातडीने वीजजोडणी साठी महवितरण बांधील असून ज्यांना वीजजोडणी घ्यावयाची आहे त्यांनी संबधित कर्मचारी अथवा अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच वीजग्राहकांना अखंडित व पुरेशा दाबाने वीज मिळण्यासाठी वीज बिल भरून सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी केले आहे.

