अभिजित पाटील यांची विधानसभेची तयारी सुरू, मंगळवेढ्यात वाढता संपर्क
खुपसंगी येथे जेसीबीतून पुष्पवृष्टी करत नागरिकांनी केले स्वागत
पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी विधानसभेची तयारी सुरू केली असून त्यांनी मंगळवेढा तालुक्यात दौरे सुरू केले असून तालुक्यातील अनेक गावोगावी वाड्यावस्त्यावर जाऊन भेटीगाठी व लोकसंपर्क करीत असल्याचे दिसत आहे.
दिनांक २९जुलै रोजी हिंदू-मुस्लीमाचा पवित्र असणारा मोहरम सणानिमित्त खूपसुंगी येथे श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी भेट दिली असता गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात जेसीबीतून पुष्पवृष्टी करून व हलगीच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अभिजीत पाटील हे मोठ्या लोकसंपर्कात असून गावोगावी कार्यक्रमात प्रत्येकाच्या सुखदुःखात पाटील हे उपस्थित राहत असताना दिसत आहेत. विठ्ठल कारखाना निवडणुकीनंतर त्यानी आपला जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. तसेच गेल्या काही दिवसापूर्वी विठ्ठल कारखाण्यावरील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूर विधानसभा मतदार संघातून अभिजित पाटील यांच्या उमेदवारीचे सूतोवाच केले होते.त्यावेळी अभिजित पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कमोर्तब झाल्याने पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी चांगलीच तयारी सुरू केली आहे.

राष्ट्रवादीच्या फुटी नंतर देखील पाटील यांनी खा शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना एकत्रित करत पाटील यांनी चांगलीच तयारी सुरू केली असून विविध कार्यक्रम,भेटीगाठी यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचत असल्याचे चित्र दिसत आहे.

