खंडोबा गल्ली कुस्ती केंद्राच्या माध्यमातून चांगले मल्ल घडावेत:आ समाधान आवताडे
मंगळवेढयात खंडोबा गल्ली येथे आ.आवताडे यांच्या हस्ते कुस्ती केंद्र इमारत व रस्ता काँक्रिट करण कामांचे भूमिपूजन
मंगळवेढा प्रतिनिधी
मल्लांची गल्ली अशी ख्याती असणाऱ्या खंडोबा गल्लीतील कुस्ती केंद्राला या भव्य-दिव्य तालीम इमारतीच्या माध्यमातून चांगले मल्ल घडवून नवी ओळख व आणि लौकिक प्राप्त व्हावा असा आशावाद व्यक्त करत भविष्यकाळात देखील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन आ समाधान आवताडे यांनी मंगळवेढा येथे केले.

आमदार समाधान आवताडे यांच्या स्थानिक आमदार निधीतून मंगळवेढा शहरातील खंडोबा गल्ली येथे मंजूर झालेल्या जय मल्हार तालीम दुमजली इमारत बांधणे व गल्लीतील रस्ता काँक्रिटीकरण करणे या विकास कामांचे भूमिपूजन आ. समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते व मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे नूतन चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले .त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की सार्वजनिक जीवनाच्या व्यावसायिक,सामाजिक व राजकीय कार्यक्षितिजावर वावरण्याचे आणि यशस्वी होण्याचे मनोधैर्य ज्या गल्लीमधून मिळाले त्या गल्लीतील जनतेच्या प्राथमिक गरजांना कायम अग्रक्रम दिला जाईल. मंगळवेढा शहर विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला असून मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी आपण आमदारकीच्या माध्यमातून जेवढे शक्य होईल तेवढे प्रयत्न करीत राहू असेही आ. आवताडे यांनी सांगितले.

यावेळी दामाजी शुगर चे माजी व्हा. चेअरमन रामचंद्र वाकडे, किसन सावंजी, प्रा.येताळा भगत, अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, दत्तात्रय जमदाडे, जिल्हा लेबर फेडरेशन संचालक सरोज काझी, खरेदी-विक्री संघाचे माजी व्हा चेअरमन कैलास कोळी, माजी संचालक पै.मारुती वाकडे, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, दामाजी शुगर चे संचालक मुरलीधर दत्तु, माजी सैनिक मुरलीधर घुले, माजी नगरसेवक महादेव जाधव, सचिन शिंदे , विलास आवताडे, पै.दादासाहेब ओमणे, माजी नगरसेवक खंडू खंदारे , सरपंच शिवाजी सरगर, युवक नेते विराज आवताडे, माजी सरपंच नंदकुमार जाधव, जनार्धन डोरले, सत्यजित सुरवसे, शंभू नागणे, उद्योजक अशोक लेंडवे, प्रहार संघटना तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, प्रताप सावंजी, बाळासाहेब आवताडे, परमेश्वर पाटील, उद्योजक बंडू आवताडे, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष उमेश आवताडे, गणेश सावंजी, यशोदा पतसंस्थेचे अतुल मुरडे सिद्धेश्वर पाटील, शिवाजी सावंजी, सचिन हेंबाडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन न. पा. प्राथ. शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर यादव यांनी केले तर आभार परमेश्वर पाटील यांनी मानले.

