मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी सिद्धेश्वर आवताडे यांची निवड
व्हा चेअरमनपदी सिद्धेश्वर कनशेट्टी, शेतकरी हिताला प्राधान्य देणार: आवताडे
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी दुसऱ्यांदा सिद्धेश्वर आवताडे यांची तर व्हाईस चेअरमन पदी सिद्धेश्वर कनशेट्टी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
ज्येष्ठ नेते व डीसीसी बँकेचे माजी व्हा चेअरमन बबनराव आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी विक्री संघाची निवड बिनविरोध झाली नूतन पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद दुरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 24रोजी सकाळी 11 वा मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात संपन्न झाली यावेळी चेअरमन पदासाठी सिद्धेश्वर आवताडे व व्हाईस चेअरमन पदासाठी सिद्धेश्वर कनशेट्टी यांचे एकमेव अर्ज आला होता.त्यामुळे दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या.
निवडीनंतर नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बबनरावजी आवताडे यांच्या हस्ते करण्यात आला. निवडीनंतर बोलताना नूतन चेअरमन सिद्धेश्वर आवताडे म्हणाले खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या व ग्राहकांसाठी विविध योजना राबवल्या जातील. तसेच खरेदी विक्री संघाचे कामकाज कौतुकास पात्र करून संघाचा कारभार केला जाईल असे सांगितले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मंगळवेढा प्रमोद दुरगुडे साहेब यांचा सत्कार बबनरावजी आवताडे व कार्यालयीन अधीक्षक सचिन जाधव यांचा सत्कार नुतन चेअरमन सिध्देश्वर आवताडे यांच्या हस्ते करणेत आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुशील आवताडे,खरेदी विक्री संघाचे नुतन संचालक संजय नागणे, महादेव जगताप, मल्लाप्पा चौखंडे, शशिकांत भिंगे, राजेंद्र पाटील, राजेंद्र चेळेकर, सोमलिंग हत्ताळी, लक्ष्मण धसाडे, सविता गवळी, उमा पाटील, भीमराव येडवे, विशाल जाधव, श्रीकांत पुकळे, दामाजी नगरचे सरपंच जमीर सुतार, गजानन पतसंस्थेचे चेअरमन संजय जगताप, बाजार समितीचे संचालक मनोज चव्हाण, पाठखळ सरपंच ऋतूराज बिले.ॲड. दत्तात्रय तोडकरी ॲड. इरफान सय्यद, माऊली वाघमारे, सागर वाघमारे, शिवाजी गायकवाड, बसवेश्वर माळी, विजय जावळे, अमित गवळी, सोमनाथ शिंदे, माऊली सातपुते, कमलेश माळी, सचिन गडेकर, सागर जाधव, दादा बुरजे, प्रमोद सावंजी, यांच्या सह आदि मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन हणमंत मासाळ व आभार प्रदर्शन खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक शंभुमामा नागणे यांनी केले.

