Take a fresh look at your lifestyle.

मंगळवेढा तालुक्यात चाराछावणी व चाराडेपो सुरु करा- आ समाधान आवताडे यांची अधिवेशनात मागणी

2018-19मधील छावणी चालकांची थकीत 34कोटीची बिले अदा करा

1,469

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

संपूर्ण राज्यातील विविध भागांमध्ये पूर-महापूर यांनी थैमान घातले असताना मंगळवेढा तालुक्यामध्ये
पावसाने अपेक्षेप्रमाणे हजेरी न लावल्याने पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या भागातील पशुधन जगविण्यासाठी मंगळवेढा तालुक्यामध्ये चाराछावणी व चाराडेपो सुरू करण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत लक्षवेधी द्वारे केली आहे.
          सद्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून विधानसभेमध्ये आ. अवताडे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न मांडत आहेत.यावेळी आमदार आवताडे म्हणाले की पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांचे पशुपालन हे उदरनिर्वाहाचे जोडसाधन आहे. परंतु सध्या पावसाने ओढ दिल्याने पाण्याची व चाऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. या भागातील पाण्याची भूजल पातळी ८००ते १००० मीटर एवढ्या खोलीवर असल्यामुळे पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे अनेक पशुपालक ४००० ते ५००० हजार रुपये प्रतीटन दराने ऊसाचा चारा आणत आहेत. गावभेट दौरया मध्ये अनेक शेतकरी व पशुपालक यांनी या टंचाई पार्श्वभूमीवर चारा डेपो सुरु करण्याची माझ्याकडे मागणी केली होती. तालुक्यात पशुधन संख्या मोठी असून पाच लाख लिटर दुधाचे प्रतीदिन संकलन होत आहे.येथील अर्थकारणाचा महत्वपूर्ण असणारा दुध व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी व पशुधन जगविण्यासाठी शासन पातळीवरून सदर चारा डेपो लवकरात-लवकर सुरु करण्याची कार्यवाही व्हावी अशी मागणी आ. आवताडे यांनी केली आहे. या चाराछावणी व चाराडेपो सुरु करण्यासाठी आ. आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर संबंधित मंत्री महोदय यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून पत्र व्यवहाराच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे.
            त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील चाळीस गावांसाठी वरदायिनी असणारी ४०गाव भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू होऊन या योजनेअंतर्गत येणारे पाणी वीस गावांपर्यंत पोहोचले आहे. परंतु उरलेल्या वीस गावांना व इतर वाड्या-वस्त्यांवर माणसांना व जनावरांना पिण्यासाठी या योजनेचे पाणी देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले.
           सन २०१८-१९ मध्ये दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा व सांगोला तालुक्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या जनावरांच्या मंगळवेढा तालुक्यामध्ये ६० चाराछावण्या चालकांचे जवळपास १२ कोटी व सांगोला तालुक्यातील १६० छावण्या चालकांचे २२ कोटी बिले शासनदरबारी प्रलंबित आहेत. परंतु तत्कालीन चारा छावण्या चालकांचे बिल अद्यापही अदा करण्यात न आल्यामुळे या चालकांना खूप मोठ्या अर्थिक विवांचनेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आशा चालकांची बिले ही लवकरात लवकर मिळावेत अशी मागणी आमदार आवताडे यांनी केली आहे. राज्यातील शेतकरी व सर्व सामान्य जनतेचे प्रती अतिशय संवेदनशील आणि भक्कम असणारे हे सरकार या सर्व मागण्या लवकरात लवकर मार्गी लावेल असा विश्वास आमदार आवताडे यांनी व्यक्त केला.

चौकट –

      थकीत चाराछावण्या बिलाच्या संदर्भात संबंधित जिल्हाधिकारी यांना याबाबत आवश्यक त्या सूचना देऊन ही सर्व बिले लवकरात लवकर अदा करण्यासाठी आदेश देवू असे मंत्री महोदय यांनी सांगितले.

चौकट-
       एका गावात पडलेला पाऊस दहा गावच्या माथ्यावर मंगळवेढा तालुक्यामध्ये मंडळ निहाय पर्जन्यमापक यंत्र आहे एका मंडळ मध्ये दहा ते अकरा गावांचा समावेश आहे एका गावात पाऊस पडला तर दहा गावात पाऊस पडल्याची नोंद शासन दरबारी होत असल्यामुळे दुष्काळी गावावर अन्याय होत असून याकडेही शासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More