Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री सौर प्रकल्प अंतर्गत सौर ऊर्जा निर्मितीवर भर द्यावा-आ समाधान आवताडे

आ समाधान आवताडे यांनी केला पंढरपूर विभाग नूतन कार्यकारी अभियंता विजय पाटील यांचा सत्कार

1,068

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी सौर प्रकल्पाच्या माध्यमातून  वीज निर्मिती होण्यासाठी प्राधान्य द्यावे तसेच मतदार संघातील विजेच्या संदर्भात पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रस्ताव द्यावे सरकारकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देवू अशी ग्वाही आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
         महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी पंढरपूर विभागामध्ये कार्यकारी अभियंता म्हणून विजय पाटील रुजू झाल्याने त्यांचा सत्कार पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा आवताडे यांच्या हस्ते आवताडे फार्म हाऊस मंगळवेढा येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

         यावेळी मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज टंचाई जाणवू नये अखंडित व पुरेशा दाबाने वीज मिळावी यासाठी अडीशनल व नवीन डीपी देणे, नवीन लिंक लाईन टाकने, खाजगी व सरकारी जागेमध्ये सौर प्रकल्प उभा करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे यासह विविध विषयावर यावेळी चर्चा झाली. यावेळी आमदार अवताडे यांनी मतदारसंघात विजेच्या संदर्भात चांगल्या पद्धतीने काम करून एक वेगळा पॅटर्न निर्माण करावा, शेतकरी व ग्राहकांना चांगल्या पद्धतीने वीज मिळावी याबाबत सूचना दिल्या. तसेच विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.                       यावेळी  कार्यकारी अभियंता विजय पाटील,अतिरिक्त कार्यकारी अभियंता भिकाजी भोळे, उपकार्यकारी अभियंता प्रकाश पाटील, शशिकांत चव्हाण, अंबादास कुलकर्णी, चंद्रकांत पडवळे,प्रदीप खांडेकर, राजन पाटील विकास पुजारी, संजय पाटील, आनंद पाटील, कैलास कोळी, महादेव जाधव, राजेंद्र सुरवसे अशोक माळी, दीपक सुडके, स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे, संतोष पवार, आदी उपस्थित होते.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More