Take a fresh look at your lifestyle.

घरफोडीतील संशयित आरोपीचा कारनामा

अटक टाळण्यासाठी पिला विषारी औषध

506

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

मंगळवेढा पोलिस ठाण्यात घरफोडी तपासकामी आणलेल्या अरबळी ता.मोहोळ येथील
संशयित आरोपी शशिकांत शिवाजी घाडगे याने पोलिसांकडून होणारी अटक टाळण्यासाठी विषारी औषध प्राशन केल्याने पोलिसांनी पुढील अनर्थ टाळण्यासाठी आरोपीला उपचारासाठी खाजगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात केले.
दरम्यान या संशयीत आरोपीचा हॉस्पिटलमध्ये जबाब घेण्यात आला असून त्याने स्वतःहून औषध पिल्याची कबुली दिली असल्याचे पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी सांगितले.
           पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात यापुर्वी झालेल्या घरफोडयांचा तपास सुरु असताना संशयित आरोपी म्हणून चौकशीकामी अरबळी येथील शशिकांत घाडगे याला मंगळवेढा पोलिस ठाण्यात आणले होते.दरम्यान चौकशी सुरु असताना पोलिसांना त्याने आपण विषारी औषध प्राशन केल्याचे सांगून तुम्ही मला अटक करू शकत नाही.असा इशारा दिला. यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक बापूसाो पिंगळे यांनी या घटनेची गांभिर्यपूर्वक दखल घेवून स्वतःच्या चार चाकी गाडीत खाजगी दवाखान्यात नेवून उपचारासाठी दाखल केले.

            सदर ठिकाणी या संशयीत आरोपीचा जबाब घेण्यात आला असून त्याने स्वतःहून औषध पिल्याची कबुली दिली असल्याचे पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी माहिती दिली.सदर आरोपीने यापुर्वीही स्वतःची अटक टाळण्यासाठी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातही असाच प्रकार केल्याची माहिती उघड झाली असून डॉक्टर त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More