पंढरपूर विभाग महावितरणच्या कार्यकारी अभियंता पदी विजय पाटील रुजू
शेतकरी व ग्राहकांना लोकाभिमुख सेवा देणार - विजय पाटील
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयाच्या कार्यकारी अभियंता पदी कोल्हापूर येथून प्रमोशन बदली झालेले विजय पाटील यांनी आपल्या पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला आहे.
पाटील हे मूळचे कोल्हापूर येथील असून 2004मध्ये कवठे महांकाळ येथे सहाय्यक अभियंता म्हणून रुजू झाले होते. त्यानी चाचणी विभाग कोल्हापूर,उपकार्यकारी अभियंता विटा,अतिरिक्त कार्यकारी अभियंता सातारा,कोल्हापूर येथे त्यांनी उत्कृष्ठ काम केले आहे. सध्या त्यांची कोल्हापूर अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदावरून प्रमोशन होऊन पंढरपूर येथे बदली झाली आहे. त्यांनी येथील पदभार स्वीकारला आहे. सध्या आषाढी वारी काही दिवसावर येवून ठेपली असताना महावितरण कडून चांगली सेवा देण्याचे नियोजन त्यानी हाती घेतले आहे.
महावितरण कडून शेतकरी व ग्राहकांना चांगल्या पद्धतीने लोकाभिमुख सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असून वीजग्राहकांना अखंडित व पुरेशा दाबाने वीजपुरवठा दिली जाईल तसेच वीज बिल थकबाकी वसुली व वीज चोरी विरोधात कडक मोहिम राबवली जाईल.पायाभूत सोईसुविधा उभारणी साठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पदभार घेतल्यानंतर आषाढी वारीच्या नियोजनाबाबत त्यानी अधिकारी व कर्मचारी यांच्या बैठका घेतल्या जात आहेत.

