Take a fresh look at your lifestyle.

इंग्लिश स्कूलची अभिज्ञा राक्षे १०० टक्के गुण मिळवून राज्यात पहिली

895

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
मार्च २०२३ मध्ये राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बोर्ड दहावी (एस.एस सी) परीक्षेत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इंग्लिश स्कूल मंगळवेढाच्या विद्यार्थ्यांनी
अभिज्ञा विरेंद्र राक्षे हिने १०० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे
             प्रशालेचा शेकडा निकाल ९६.०३ टक्के लागला आहे.एकुण ४५४ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ४३६ उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये कु. अभिज्ञा विरेंद्र राक्षे हिने १०० टक्के गुण मिळवून राज्यात व प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला,कु.प्राची अर्जुन ओमणे हिने ९७.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला तर कु. वैष्णवी संतोषकुमार नाईकवाडी हिने ९६.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.९० टक्के पेक्षा जास्त गुण असलेले ५० विद्यार्थी आहेत.तर अभिज्ञा राक्षे व सायली विलास बनसोडे यानी गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.
या निकालामुळे इंग्लिश स्कूल च्या उज्वल यशाची परम्परा कायम राहिली आहे. या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक शिक्षिका यांचे संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम,संस्थेच्या ऍडमिनिस्ट्रेटर डॉ.मिनाक्षी कदम,अध्यक्ष अड सुजीत बापू कदम ,सचिवा प्रियदर्शनी महाडिक, संचालिका तथा उपप्राचार्या तेजस्विनी कदम,सहसचिव श्रीधर भोसले,संचालक अजिता भोसले,अॅड.शिवाजी पाटील, रामचंद्र नेहरवे,यतिराज वाकळे प्राचार्य रवींद्र काशीद, उपमुख्याध्यापक सुनील नागणे, पर्यवेक्षक राजू काझी, दिलीप चंदनशिवे, सुहास माने आदिंनी अभिनंदन केले आहे

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More