मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी ते हुलजंती रोड दरम्यान फौजी धाब्याच्या बाजूस
देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या महिंद्रा पिकअप क्र.एम. एच. 10 डि.टी 1276 वर सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांनी कारवाई करत 10 लाख 20 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चालक यासीन मुल्ला याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की मंगळवेढा पोलिसांनाहुलजंती येथे अवैध दारू वाहतुकीची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सपोनि बापूसाहेब पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि अंकुश वाघमोडे व त्यांचे सहकारी दिनांक 1जून रोजी या भागात गस्त घालीत असताना सोड्डी ते हुलजंती रोड दरम्यान फौजी धाब्याच्या बाजूस महिंद्रा पिकअप क्रं.एम एच 10 डि.टी 1276 मधून अवैध दारू वाहतूक होत असल्याचे तपासणीत आढलून आले.त्यावेळी पोलिसांनी पिक अप वाहन,अवैध देशी व विदेशी दारू असा 10 लाख 20 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलिस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांच्या पथकाने केले आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत

